Monday, April 14, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : महात्मा फुले यांचे समाजाप्रती समर्पण आजच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत – योगेश बहल

पिंपरी चिंचवड – आज ११ एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासात विशेष महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाते. ते केवळ एक सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर एक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत देखील होते. १९ व्या शतकात, जेव्हा समाज जात आणि लिंग भेदभावाशी झुंजत होता, तेव्हा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी निर्णायक चळवळ सुरू केली. (PCMC)

---Advertisement---

आजही ज्योतिबा फुले यांचे जीवन आणि त्यांचे विचार समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी काम करणाऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त, आपण त्यांचे योगदान लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यांचे आदर्श स्वीकारण्याची प्रेरणा घेण्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी (दि.११) शुक्रवारी केले. तसेच आजच्या तरूण पिढीने फुले दाम्पत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी, असेही ते म्हणाले.

योगेश बहल पुढे म्हणाले, विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, इतके अनर्थ अविद्येने केले, अशा शब्दात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच स्त्रियांना शिक्षण मिळावे अन्‌ तत्कालिन समाजातील निरक्षरता व गुलामगिरीचं उच्चाटन व्हावे, यासाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेंच्या वाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. अज्ञानाच्या अंधारात बंदिस्त स्त्रियांची मुक्तता करण्यासाठी फुले यांनी स्त्री शिक्षणाचे नवे पर्व सुरू केले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंत्तीनिमित्त खराळवाडी, पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालयातील फुले यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बहल बोलत होते. याप्रसंगी ॲड.गोरक्ष लोखंडे, माजी नगरसेवक माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे,दिपक साकोरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, उद्योग व्यापार अध्यक्ष श्रीकांत कदम, असंघटीत कामगार अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, उपाध्यक्ष संपत पांचुदकर, माऊली मोरे, चंद्राम हलगी, रविंद्र सोनवणे, भाग्यश्री म्हस्के, सपना कदम, निलम कदम, शमा सय्यद,रामकिसन माने, पक्ष कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे, सुनील अडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (PCMC)

जगातील भिडे वाड्यातील पहिली शाळा आणि जगातील पहिली महिला शिक्षकाही आम्हाला मिळाली. त्यामुळेच आमच्या हाती पाटी पेन्शील आली आहे. त्यामुळे महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या तरुण पिढीने वाटचाल करायला हवी, असेही लोखंडे यावेळी म्हणाले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles