Wednesday, March 12, 2025

PCMC : घोलप महाविद्यालयात लैंगिक अत्याचार प्रतिबंध विषयावर व्याख्यानाचे आयोजन

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील लैंगिक अत्याचार तक्रार समिती अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दिनांक ३ मार्च २०२५ रोजी पुणे जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ विधी तज्ञ ॲड ज्योती दत्तात्रय सोरखडे यांचे “लैंगिक अत्याचार प्रतिबंध: जागरूकता व कायदे ओळख” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. (PCMC)

सदर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व कार्यक्रमाच्या साधनव्यक्ती ॲड.सोरखाडे मॅडम यांनी लैंगिक अत्याचार म्हणजे काय त्यात समाविष्ट होणाऱ्या बाबी व त्यासंबंधी असणारे नियम व कायदे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती समन्वयक डॉ. अमृता इनामदार यांनी केले. त्यामध्ये त्यांनी समितीचा उद्देश व त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. (PCMC)

सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा डॉ वंदना पिंपळे, महाविद्यालयीन विकास समितीच्या सदस्या डॉ. चंदा हासे आणि ॲड. वंदना सोरखाडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा, महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. संगीता जगताप यांनी महाविद्यालायातील कोणत्याही विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचार किंवा तत्सम कोणत्याही विषया बाबत आपली तक्रार असेल तर ती निसंकोचपणे समितीच्या सदस्यांकडे नोंदवावी असे आवाहन केले व त्याचे नक्कीच सदर समस्यांचे निराकरण महाविद्यालयाच्या समिती अंतर्गत करण्यात येईल असे प्रतिपादन केले. (PCMC)

सदर कार्यक्रमास कला, वाणिज्य, विज्ञान व बी. व्होक शाखेतील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपाली चिंचवडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. गुरुदेवी स्वामी यांनी केली व आभार प्रा प्रणाली शितोळे यांनी मानले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.नरसिंग गिरी, डॉ मनीषा शेवाळे, डॉ. सीमा चौहान, प्रा. शीतल नलावडे, डॉ. मनीषा त्र्यंबके, डॉ रश्मी भूयान, प्रा सुषमा सोनार, प्रा. प्रणाली शितोळे, प्रा. सद्दाम घाटवाले व प्रणित पावले यांनी देखील विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles