पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील इयत्ता चौथीतील विद्यार्थी कार्तिक निवते याने बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पोर्ट्स फॉर ऑल सीजन ३, २०२४-२५ या स्पर्धेत स्केटिंग प्रोफेशनल क्वाडस या क्रीडा प्रकारात अकरा वर्षाखालील वयोगटात उल्लेखनीय यश संपादन केले. (PCMC)
कार्तिक निवते याने पुणे विभागात २०० मीटर मध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच ५०० व ८०० मीटर मध्ये कांस्यपदक मिळवून एकूण तीन पदकांची कमाई केली. त्याला क्रीडा शिक्षक महेश नलावडे, प्राचार्य डॉ. बिंदु सैनी, उपप्राचार्य पद्मावती बंडा यांचे मार्गदर्शन लाभले. (PCMC)
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्तिक निवते याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
हे ही वाचा :
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी
गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार
डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…
NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती
जुन्नर : श्रेयश कदमची राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धसाठी निवड