Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पीसीसीओईआर मध्ये तंत्रज्ञानाची 'नवधारा' - डॉ. मारुती जाधव

PCMC : पीसीसीओईआर मध्ये तंत्रज्ञानाची ‘नवधारा’ – डॉ. मारुती जाधव

राज्यातील १४ जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांचे २५० संघ सहभागी (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : विविध नाविन्यपूर्ण उपक्र‌मांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर उपाय शोधण्याचे सामर्थ्य येते. अभियांत्रीकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये हेच सामर्थ्य प्रज्वलित करण्याचे काम करते’, असे प्रतिपादन महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशास‌कीय सेवेचे सहायक संचालक डॉ. मारुती जाधव यांनी केले. (PCMC)

पीसीईटीच्या रावेत येथील पीसीसीओईआर येथे ‘नवधारा २०२४’ या राज्यस्तरीय प्रकल्प व पोस्टर्स स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. मारूती जाधव बोलत होते. सासाई कंपनीचे उपाध्यक्ष केतन नवले, कि डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे संचालक एम. टी. अभिलाश, आयबीएम कंपनीचे सॉफ्टवेअर आर्किटेक्ट सर्वेश पटेल, पीसीसीसोईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख प्रा. तुषार गायकवाड, प्रा. प्रिया ओघे, प्रा. मनिषा देशपांडे, प्रा. प्रिती घुटे पाटील, प्रा. निलेश ठुबे आदी उपस्थित होते. (PCMC)

अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यानंतरच विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधनाची उर्मी येते. ‘नवधारा – २४’ सारखे कार्यक्रम आपल्या देशातील युवकांना अशीच दिशा देण्याचे काम करत आहेत. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्चने (पीसीसीओईआर) हा कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे असे डॉ. जाधव म्हणाले.

अभियांत्रीकी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‌स्पर्धेत एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा संपूर्ण राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतील अडीचशेहून अधिक संघ सहभागी झाले आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी यश उराडे, आर्यन वाघमारे व रूपम अग्रवाल बोनी आपले मनोगत व्यक्त केले. (PCMC)

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ हरिष तिवारी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

लोकप्रिय