व्यवसाय वाढीसाठी आणि स्वच्छ सुरक्षित अन्नासाठी होणार फायदा (PCMC)
पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड शहरातील वडापाव ,चहा नाश्ता, ज्यूस, फळे विक्री, आईस्क्रीम, भेळ पाणीपुरी सह खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची एक दिवशीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले यामध्ये ५२५ विक्रेत्यानी सहभाग घेतला त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात अन्न पर्यवेक्षक प्रमाणपत्राचे वाटप सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. (PCMC)
यावेळी सुरेश अन्नपुरे सह आयुक्त पुणे, एस.एस.क्षीरसागर सहा.आयुक्त ए.आर.देशमुख सहा.आयुक्त, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, आर.आर.काकडे, ना.रा.सरकटे, इरफान चौधरी, वृषाली पाटणे, नंदा तेलगोटे, जरिता वाठोरे, रुक्मिणी माशाळकर, फरीद शेख, सहदेव होनमने, कालिदास गायकवाड, श्रीहरी खत्री, मुमताज शेख, अंबालाल सुखवाल, रज्जाक शेख,विनोद इंगळे, सुरेश देडे आदी उपस्थित होते.
यावेळी अन्नपुरे म्हणाले की खाद्यपदार्थ तयार करत असताना किंवा त्याची हाताळणी करत असताना आपण हे पदार्थ स्वतः खाणार आहोत आपले जवळचे नागरिक खाणार आहेत ही भावना मनामध्ये ठेवून ते बनवावे आणि ते खाद्यपदार्थ आपल्या ग्राहकांना द्यावेत म्हणजे ते अन्न सुरक्षित आणि सुस्थितीत राहतील याची काळजी घेण्याची गरज आपणा सर्वांना हे व्यवसायाची जागा आणि पदार्थ हे सुरक्षित बनवणे व ठेवणे, नीटनेटकेपणा असणे गरजेचे आहे. (PCMC)
देशमुख म्हणाले की, शहरातील विक्रेत्यानी खाद्यपदार्थांमध्ये ज्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत त्यांची एक्सपायरी डेट पाहून घ्यावी व त्याचा दर्जा सुद्धा तपासून घेण्यात यावा आपण जे बनवतो स्वच्छ व दर्जेदार होईल.
नखाते म्हणाले की स्मार्ट हॉकर्स स्मार्ट बिझनेस साठी आम्ही तयारीत आहेत संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियान अंतर्गत अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे हे अभियान यशस्वी राबविण्यात येत असून ३६०० पेक्षा अधिक विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले असून शहर पथविक्रेता समिती सदस्य यात सक्रिय असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांचेही सहकार्य लाभत आहे. हे अभियान यशस्वी होत असून विक्रेत्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी हे आमची योग्य तयारी सुरू असून असे प्रशिक्षण पुढील कालावधीमध्ये सुद्धा आयोजित करण्यात येणार असून त्यांना प्रमाणपत्र वाटपाचे नियोजन करण्यात येत आहे.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : अन्नपदार्थ पथविक्रेत्यांना शासनाचे प्रमाणपत्र वाटप
---Advertisement---
- Advertisement -