Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

तारक मेहता का उल्टा चश्मा मधील अभिनेता ललित मनचंदा यांची आत्महत्या

Lalit Manchanda : बॉलीवुड आणि टेलिव्हिजन अभिनेता ललित मनचंदा यांनी सोमवारी, २१ एप्रिल २०२५ रोजी मेरठमधील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ३६व्या वर्षी त्यांनी आपले जीवन संपवले.

---Advertisement---

अभिनेता ललित मनचंदा (Lalit Manchanda) यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’, ‘मर्यादा’, ‘झांसी की रानी’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या अचानक निधनाने टेलिव्हिजन आणि बॉलीवुड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : सोन्याचा दर 1 लाखांवर ; वाचा पुणे, मुंबई मधील सोन्याचे दर)

मेरठच्या लिसाडी गेट परिसरातील प्रह्लाद नगर येथे ललित मनचंदा आपल्या कुटुंबासह राहत होते. सोमवारी त्यांनी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना आढळले. कुटुंबाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ललित यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही, त्यामुळे पोलिस ललित यांच्या मानसिक स्थितीचा आणि अलीकडील घटनांचा सखोल तपास करत आहेत.  (हेही वाचा – ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन : भारतात 3 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर)

---Advertisement---

ललित मनचंदा गेल्या काही काळापासून आर्थिक संकट आणि मानसिक तणावातून जात होते. त्यांनी १२ वर्षे मुंबईत अभिनय क्षेत्रात काम केले, परंतु कोविड-१९ नंतर त्यांना काम मिळणे बंद झाले. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले.  (हेही वाचा – लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हफ्ता कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली तारिख)

ललित मनचंदा यांनी २०१२ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये छोट्या पण लक्षवेधी भूमिका साकारल्या. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत त्यांनी एका छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. याशिवाय, २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेवा एक्सप्रेस’ या टीव्ही मिनी-सीरिजमध्येही त्यांनी काम केले होते.  (हेही वाचा – मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला, २६ पर्यटकांचा मृत्यू)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles