Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : गोपीनाथ मुंडे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी (BJP)

भाजपा पक्ष कार्यालयात मुंडे साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन ! PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. Gopinath Mundhe Memorial Day

मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी शंकर जगताप यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आजही आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे, तसेच त्यांच्या विचारांचे पाईक होणे ही खरी आदरांजली ठरेल, अशी भावनाही जगताप यांनी व्यक्त केली. pcmc

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, माऊली थोरात, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, बेटी बचाव बेटी पढाओ प्रकोस्थ संयोजिका प्रीती कामतीकर, अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी गणेश ढाकणे, रोजगार, स्वंयरोजगार व कौशल्य विकास सक्षमीकरण आघाडी अध्यक्ष भारत मदने, माजी नगरसेवक बाळासाहेब भुंबे, युवा मोर्चा सरचिटणीस सतीश नागरगोजे, जिल्हा चिटणीस मंगेश धाडगे, संयोजक जैन प्रकोष्ठ संदेश गादीया, बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक मनोजकुमार मारकड, सुनील वाठ आदी उपस्थित होते. pcmc news

याप्रसंगी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला तिस-यांदा विजय मिळाल्याबददल आनंद व्यक्त करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपाला स्पष्ट बहुमत देऊन विकसित भारताच्या निर्मितीमध्ये योगदान देणा-या अरुणाचल प्रदेशमधील सर्व मतदार बांधवांचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आभार मानले.

---Advertisement---

तसेच, अरुणाचल प्रदेशमधील नागरिकांचे, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय पक्षप्रमुख मा. जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री पेमा खांडू, अरुणाचल भाजपा प्रदेशाध्यक्ष बीयूराम वाघे आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली अरुणाचल प्रदेशात भाजपा सरकार जनकल्याणासाठी भक्कमपणे काम करेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. BJP PCMC

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

---Advertisement---

‘गाढवाचं लग्न’ मधील लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मत्स्यव्यवसाय विभागात भरती, पगार 2 लाखांपर्यत

सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

दुचाकीत साडीचा पदर अडकून पुण्यातील महिलेचा मृत्यु

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles