पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मोशी येथे 11 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या किसान प्रदर्शनामध्ये केएसबी लिमिटेडने कृषी, घरगुती आणि सौर पंपांच्या प्रगत तंत्रज्ञानाची झलक सादर केली आहे. (PCMC)
भारतातील सर्वात मोठ्या कृषी मेळ्यांपैकी एक असलेल्या या प्रदर्शनात शेतकरी व कृषी व्यवसायातील व्यावसायिकांना एकत्र आणून नवनवीन कृषी उपकरणे व तंत्रज्ञान सादर करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
केएसबी लिमिटेड, इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव जैन आणि महावीर एंटरप्रायझेसचे मान्यवर डीलर श्री. सचिन चांगेडिया यांनी कृषी आणि घरगुती पंप स्टॉलचे उद्घाटन केले. तसेच श्री. जैन, केएसबी इंस्टॉलर श्री. घनश्याम भुमकर आणि श्री. अक्षय चव्हाण यांनी सौर पंप स्टॉलचे उद्घाटन केले. केएसबी लिमिटेडने प्रदर्शनात दोन स्वतंत्र स्टॉल्स उभारले असून, या स्टॉल्सला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. (PCMC)
कृषी आणि घरगुती पंप स्टॉलचे वैशिष्ट्ये
या स्टॉलमध्ये V6 पंपचे आडवे (horizontal) डेमो प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधले गेले आहे. याशिवाय, 6″ बोरवेल सबमर्सिबल पंपच्या यशस्वी आडव्या स्थापनेबाबत विद्यमान ग्राहकांनीही आपला अनुभव शेअर केला.
या स्टॉलमध्ये सेल्फ-प्राइमिंग अक्वा सिरीज (0.5-1.5HP), ओपनवेल पंप (1PH & 3PH), 4″ बोरवेल सबमर्सिबल पंप, LX+ आणि RLX सिरीज, ऑइल-फिल्ड 4″ बोरवेल सबमर्सिबल पंप UMN सिरीज आणि मल्टिबूस्ट KHM / पेरिबूस्ट पंप्स – प्रेशर बूस्टर सिरीज यांसारखी विविध उत्पादने सादर करण्यात आली आहेत. नियंत्रण पॅनल्स, स्टार्टर आणि फ्लॅट सबमर्सिबल केबल्स यांसारखी अॅक्सेसरीजही प्रदर्शनात आहेत.
याशिवाय, केएसबी बोरवेल पंप्समध्ये सर्वाधिक 4- आणि 5-स्टार रेटेड मॉडेल्स असून, ते उर्जाक्षम आहेत व ग्राहकांचे वीजबिल कमी करण्यात मदत करतात.
सौर पंप स्टॉलचे वैशिष्ट्ये
सौर पंप स्टॉलमध्ये 7.5HP पर्यंतची सौर सबमर्सिबल आणि सरफेस पंप्सची संपूर्ण श्रेणी उपलब्ध असून, ती MNRE मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारी आहे. 3HP सौर पंपसेट आणि सौर पंप कंट्रोलरचा थेट (लाइव्ह) डेमो देखील येथे पाहायला मिळत आहे.
या दोन्ही स्टॉल्सना आवर्जून भेट द्या आणि कृषी, घरगुती व सौर पंप तंत्रज्ञानातील नवनवीन प्रगती अनुभवावी. आमच्या टीमसोबत संवाद साधण्याची आणि केएसबी उत्पादनांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी गमावू नका. असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास
Fire : तामिळनाडूत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 7 ठार
महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर
धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल