पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : किवळे, विकास नगर येथील रहिवासी आणि माजी रेल्वे सिग्नल ऑपरेटर देविदास मांजरे (वय 65) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. (pcmc)
देविदास मांजरे यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारात पत्नी शकुंतला मांजरे, दोन मुले प्रशांत मांजरे आणि सुधीर मांजरे, दोन सुना पुनम मांजरे आणि स्वाती मांजरे, दोन नातवंडे, पाच भाऊ, तीन बहीणी आणि सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड यांचा समावेश आहे. आण्णा जोगदंड हे त्यांचे साडू भाऊ होते. (pcmc)
देविदास मांजरे रेल्वे खात्यामध्ये सिग्नल ऑपरेटर म्हणून कार्यरत होते आणि दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कामात सक्रिय भूमिका निभावली तसेच त्यांचा उदबत्ती व्यवसायही होता.
---Advertisement---