Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा शुभारंभ वाकडमधूनच करणार- शंकर जगताप

PCMC : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा शुभारंभ वाकडमधूनच करणार- शंकर जगताप

म्हातोबाच्या चरणी लीन होऊन विजयासाठी घेतला आशीर्वाद ! (PCMC)

वाकडकरांच्या प्रेमळ स्वागताने भारावले शंकर जगताप !

ते आले..त्यांनी पहिलं .. आणि त्यांनी जिंकलं ..!
चिंचवड विधानसभा मतदार संघात शंकर जगतापांच्या प्रचार फेरीला तुफान प्रतिसाद !

सेल्फी, हस्तांदोलन, शुभेच्छांनी वाढला प्रचारफेरीचा उत्साह !

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – वाकड म्हातोबा देवस्थानच्या आशीर्वादाने आणि वाकडवासीयांच्या भरघोस पाठिंब्याने आपण नक्कीच निवडून येणार. त्यानंतर विकासकामांची सुरुवात वाकडच्या म्हातोबा देवस्थान पासूनच करणार, अशी ग्वाही चिंचवड विधानसभा मतदार संघाचे शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी दिले. (PCMC)

वाकड गावात प्रचार दौऱ्यात म्हातोबा चरणी लीन होवून मनोभावे माथा टेकवून त्यांनी विजयासाठी आशीर्वाद घेतला. स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षात विकासाची गंगा आणली. तोच ध्यास घेवून येणाऱ्या काळात वाकडसह चिंचवड विधानसभेचा कायापालट करणार आल्याचे मत व्यक्त केले.

उमेदवार शंकर जगताप यांनी मतदारांच्या गाठी-भेटी, प्रचारफेरीच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला.

आज मंगळवारी चिंचवड विधानसभेत वातावरण काही निराळेच होते. सकाळपासूनच रस्ते अभूतपूर्व गर्दीने ओसंडू लागले.. फटाक्यांची जोरदार आतषबाजी..फुलांचा वर्षाव.. हलगीचा कडकडाट.. अशा या प्रसन्न वातावरणात चिंचवडकर उत्सुकतेने ‘त्यांची’ वाट पाहत होते… तेवढ्यात ‘ते आले..त्यांनी पाहिलं.. आणि त्यांनी जिंकलं..!’ ते होते चिंचवड विधानसभा मतदार संघाचे सर्वाधिक चर्चेतले आणि लोकप्रिय महायुतीचे उमेदवार शंकर जगताप ! जागोजागी त्यांच्या स्वागतासाठी जमलेला जनसमुदाय त्यांच्याशी हस्तांदोलन करीत शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसला. (PCMC)

महिलांनी त्यांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद आणि सदिच्छा दिल्या तर तरुण मुला- मुलींची त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली.

वाकड गावठाण पासून सुरु झालेल्या या दणदणीत प्रचारफेरीत त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक संदीप कस्पटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, श्रीनिवास कलाटे, अमोल कलाटे, युवा नेते राम वाकडकर, पिंपरी चिंचवड आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हाळकर, चेतन भुजबळ, बजरंग कलाटे, कालीदास कलाटे, रणजीत कलाटे, संतोष कलाटे, स्नेहा कलाटे, युवा नेते अक्षय कळमकर, धनराज बिर्दा, भारती विनोदे, नितीन इंगवले, गणेश कस्पटे, मुकेश कस्पटे, पियुशा पाटील, प्रसाद कस्पटे, किरण कलाटे, विक्रम कलाटे, विनोद कलाटे, संदीप वाकडकर, निखिल भंडारे, अमर भूमकर, सुरज भुजबळ, अभिमान कलाटे, अक्षय कलाटे, गणेश कळमकर, ऍड. अमोल भुजबळ, सतिश वालगुडे, ऍड. चेतन कलाटे स्वप्निल कलाटे, पंकज भंडारे, सनी कलाटे, योगेश भोसले, बाळा समिंदर, सुजित कांबळे, अविनाश शिरसाठ, सतिश राजे, सचिन लोंढे यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला

राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार

मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा

उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने

दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त ; ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय