पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चेतना हॉस्पिटल, चिंचवडच्या माध्यमातून ३० ज्येष्ठ नागरिकांनी मोफत दंत व नेत्र (Dental & Ophthalmology Camp) चिकित्सा शिबिराचा लाभ घेतला. (PCMC)
ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ आणि चेतना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चेतना हॉस्पिटल संभाजी नगर, चिंचवड येथे सोमवार दि.३ जून रोजी दुपारी ४ ते ६ या दरम्यान ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. pcmc
या शिबिरात ३० ज्येष्ठ नागरिकांची सनी राजगुरू यांनी नेत्र चिकित्सा व डॉक्टर निखिल जाधव यांनी दंत तपासणी केली.
या आरोग्य शिबिरात ज्येष्ठांच्या आरोग्य जागरुकता कार्यक्रमांतर्गत डॉ. धनंजय पाटील यांनी ज्येष्ठांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करून उर्वरित आयुष्य निरोगी राहण्यासाठी कोणता आहार घ्यावा, तसेच दैनंदिन दिनक्रम याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित ३० ज्येष्ठ नागरिकांची दात व डोळे तपासणी करुन त्यांना पुढील विचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संजय शेळके व आशिष वाघ यांची मोलाची मदत झाली. pcmc
आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष यशवंत कण्हेरे, सचिव दिनेश पाटील, खजिनदार मधुकर धकाते, शिवानंद चौगुले, विश्वास सोहोनी यांनी मेहनत घेतली आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी मोलाचे सहकार्य केले.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष यशवंत कण्हेरे यांनी केले. डॉ. निर्मल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून आरोग्य शिबिराची सांगता केली.
हेही वाचा :
पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी, तर धंगेकर आणि मोरेंना किती मते मिळाली पहा !
ब्रेकिंग : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन्ही मतदारसंघातून विजय
ब्रेकिंग : उत्तर मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्वल निकम यांचा पराभव
ब्रेकिंग : मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांचा विजय तर संजोग वाघिरे यांचा पराभव
मोठी बातमी : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव
मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव
ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर
ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर
सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण