Thursday, February 13, 2025

PCMC : श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळा निमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळा निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सांस्कृतिक संवर्धन व विकास महासंघ व विविध सामाजिक धार्मिक संस्थांच्या माध्यमातून २५०० भाविक उत्सव मंडपात अथर्वशीर्ष पठण केले. (PCMC)

ओंकार स्वरूप श्री मयुरेश्वर अवतार श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचा ४६३ वा संजीवन समाधी सोहळ्याचे दुसऱ्या दिवशी या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम अंतर्गत बुधवारी सकाळी ॐ नमस्ते गणपतये… त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि… असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात २५०० भाविकांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले.

श्री मोरया गोसावी समाधी मंदिरासमोर झालेल्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.

तेरा वर्षांपूर्वी संस्कृती संवर्धन व विकास महासंघाने सामुदायिक अथर्वशीर्षच्या सामुदायिक पठण करण्याची सुरवात केली. तेव्हापासून आजतागायत ही प्रथा चालू आहे. सदर मंत्र हे गणपती मंत्र आहेत. ह्याच्या पठणानाने गणेशतत्व जागृत होते. त्यामूळे ह्या मूर्तिपूढे केलेले नवस, प्रार्थना आदी पूर्णत्वास जातात आणि नवसाला पावणारा गणपती अशी ह्या गणपतीची ओळख निर्माण होते. (PCMC)

पंचक्रोशीतील शेकडो भाविकासह विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे प्रारंभ श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन तसेच शंखनाद व प्रार्थनाने प्रारंभ झाला. महा आरती व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

याप्रसंगी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्यकारणी सदस्य संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे पदाधिकारी व विविध सामाजिक व धार्मिक संस्थेचे प्रमुख कार्यकर्ते माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे माजी नगरसेवक सुरेश भोईर उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती

जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात

मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन

मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी

धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप

परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ

ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles