पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी व महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे या पक्ष कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या या दोन्ही जेष्ठ नेत्यांच्या ‘जयंती’ निमित्त भाजपचे माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने सर्व चिंचवडकर नागरिकांसाठी ‘12 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत’ लोकोपयोगी योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (PCMC)
यामधे नागरिकांना खालिल योजनांचा लाभ घेता येईल.
’आयुष्मान वय वंदना कार्ड हे सामाजिक-आर्थिक स्थिती न पाहता 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण प्रदान करते. हे कार्ड सुमारे 2000 वैद्यकीय प्रक्रियांचे उपचार देते आणि कोणत्याही प्रतीक्षा कालावधी शिवाय पहिल्या दिवसापासून सर्व विद्यमान आजारांना कव्हर करते.! (PCMC)
आयुष्यमान भारत ‘वय वंदना विमा’ योजना स्मार्ट कार्ड
1) आधारकार्ड
2) आधारकार्डला लींक असलेला मोबाईल नंबर
3) स्वतः व्यक्ती असणे आवश्यक.
नविन मतदार नोंदणी
१) आधारकार्ड २) पॅनकार्ड
३) घरच्या पत्त्याचा पुरावा (पुढील पैकी एक) बॅंक पासबुक, लाईट बील, गॅस पावती कार्ड
मोफत मतदान स्मार्ट कार्ड
1) प्रभाग क्रमांक 18 चिंचवडगाव मतदार यादीत नाव असणे आवश्यक.
वेळ – दररोज सकाळी 9 am ते दुपारी 1.30 व दुपारी 4.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत.
स्थळ – नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांचे जनसंपर्क कार्यालय, शेडगे बिल्डिंग, मनकर्णिका औषधालया शेजारी, पडवळ आळी, चिंचवडगाव.
या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अँड. मोरेश्वर शेडगे यांनी केले आहे.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त विविध योजनांचे शिबिर
---Advertisement---
- Advertisement -