पीसीसीओईआर मध्ये अभियांत्रिकीच्या शासकीय क्षेत्रातील संधी आणि प्रत्यक्ष अनुभवावर कार्यशाळा संपन्न (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात काळानुरूप अनेक बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर मुक्तहस्ते केला जात आहे. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्थापत्य अभियांत्रिकीतील मूलभूत संकल्पनांचे सखोल आकलन करत व्यावसायिक प्रवासाला आकार दिला पाहिजे, असे मार्गदर्शन पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी केले. (PCMC)
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्चच्या (पीसीसीओईआर) वतीने शासकीय प्रकल्प, त्यातील संधी, कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष साइटवरील अनुभव यावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती.
यावेळी मिलेनियम इंजिनीअर्स ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि.चे सहाय्यक व्यवस्थापक (प्लानिंग) मयुर सोमसे, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, डॉ. राहुल मापारी, डॉ. सुदर्शन बोबडे आदी उपस्थित होते.
प्रकल्प व्यवस्थापन, संरचना अभियांत्रिकी, शाश्वत स्थापत्य आणि प्रगत बांधकाम तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास साधला पाहिजे असे मयुर सोमसे यांनी सांगितले. यावेळी राठोड आणि सोमसे यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून संवाद साधला.
कार्यशाळेस विविध विद्याशाखेचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. अक्षय रहाणे यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
PCMC : अभियांत्रिकीतील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करावा – ज्ञानेश्वर राठोड
- Advertisement -