Monday, March 17, 2025

Pune : वुई टुगेदर फाउंडेशन वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

खेड : जिल्हा परिषदेच्या शाळा दुर्गम भागात, पट संख्या कमी, सुविधांची कायमच कमी, दळणवळण जिकरीचे अश्या अनेक समस्यांना तोंड देत आदर्श, हुशार विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांना एक आवाहनच असते. हे आवाहन स्वीकारून शिक्षक संजय होले यांनी हेंद्रुज, बच्चेवाडी ता. खेड या शाळेचा पदभार स्वीकारला. (Pune)

या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यासात तर तरबेज केलेच पण खेळ, संगीत, क्रीडा, आदी बाबतीत अत्यंत हुशार,बनून एक आदर्श निर्माण केला. त्यांनी स्वतः खर्च करून सुरवात केली व गावातील लोकसहभागातून संगणक, लॅपटॉप, लाऊड स्पीकर, स्टेशनरी, लोखंडी कपाट, स्टडी टेबल, वाल कंपाउंड, रंगकाम, ग्राऊंड दुरुस्ती, खेळाचे साहित्य, प्रिंटर, झेराक्स,आदी साहित्य लोकसहभागातून जमा करून एक आदर्श निर्माण केला.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

या सर्व कार्याची दखल घेऊन व पुढेही त्यांनी असेच कार्य सुरु ठेवावे म्हणून वूई टुगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवडच्या वतीने अध्यक्ष मधुकर बहिरू बच्चे यांच्या हस्ते व मान्यवर ग्रामस्थांच्या विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संजय गोरख होले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Pune)


फाउंडेशन संस्थापक क्रांतीकुमार कडुलकर यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार देण्यात आला.

या वेळी फाउंडेशन प्रभारी सचिव, मंगला डोळे – सपकाळे, सचिव जयंत कुलकर्णी, माजी अध्यक्ष सलीम सय्यद सदस्य श्रीरंग दाते, श्रीनिवास जोशी, खुशाल दुसाने, विलास गटने शिक्षण अधिकारी पाईट बिट विस्तारक जंगले साहेब, समीर बच्चे, उपसरपंच, गोरक्ष बच्चे,सुशांत वाडेकर,रवींद्र बच्चे, मच्छिंद्र बच्चे, विशाल बच्चे, रोडीराम बच्चे, संदीप बच्चे, सारीका बच्चे, आदी मान्यवर व शाळा समिती, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तित होते.

फाउंडेशनच्या वतीने उपस्थितांना एनर्जी ड्रिंक, खाऊ वाटप करण्यात आला.
या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी एक जबाबदार नागरिक व मोठ्या हुद्द्यावर असेल असे माझ्याकडून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न करीन असे शिक्षक होले सरांनी सर्वांना आश्वासन दिले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles