पिंपरी चिंचवड – जागतिक महिला दिनानिमित्त हौशी गायकांचा कृष्ण धवल काळातील निवडक गीतांचा निःशुल्क कार्यक्रम विविध भारती म्युझिकल इव्हेंट यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. निगडी, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे रविवारी (दि.९) सायंकाळी झालेल्या हिंदी, मराठी संगीत मैफिलीला रसिकांनी भरभरून दाद दिली. (PCMC)
यामध्ये विनायक कदम, नंदकुमार कांबळे, शैलेश घावटे, शुभांगी पवार, नेहा दंडवते, छाया अय्यर, सुचिता शेटे – शर्मा, डॉ. सायली अरुण सरमाने, अनिल जंगम, निलेश मोरे, विष्वांत काळोखे गायकांनी एकल आणि युगुलस्वरातील कृष्णधवल चित्रपटांतील गाणी सादर केली.
यामध्ये “दुनिया बनाने वाले,..” , “गोरे गोरे बाकी छोरे …” , “अफसाना लिख रही हुं…” , “बाबूजी धीरे चलना ..” , आयेगा आनेवाला आयेंगा ” , “यू तो हमने लाख हंसी देखे हैं ..” अशा एकल गीतांनी मैफलीत रंग भरले जात असतानाच अतिशय तन्मयतेने सादर केलेल्या “देखो मौसम क्या बहार हैं..” , “निंद ना मुझको आये..” , , “याद किया दिल ने कहा हो तुम ..” , “इतना ना मुझसे तू प्यार बढा …” अशा अवीट गोडीच्या युगुलगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले; तर “आजा सनम मधुर चांदणी मे हम…” या बहारदार गीताने बहार आणली. “आएगा आयेगां आनेवाला आयेंगा.” , “ओ रात के मुसाफिर…” , “हाल कैसा हैं जनाब का..” या गीतांनी मैफलीत रंगत आणली.

महिला दिनानिमित्त महिला गायिका आणि ॲड.स्मिता शेटे, डॉ. किशोर वराडे, छाया अय्यर यांचा सत्कार करण्यात आला. लकी ड्रॉ च्या पैठणीच्या मानकरी विमल बऱ्हाटे व शिल्पा कंकाळ, अर्चना भोंडवे, सुहासिनी शिंदे, स्मिता शेटे यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. (PCMC)
विनायक कदम, नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. सचिन शेटे, सनी शर्मा, अंकिता जंगम यांनी विशेष सहाय्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन व सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण, आकाश गाजुल यांनी छायाचित्रण आणि अरुण सरमाने यांनी निवेदन केले.