पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मंगलमूर्ती वाडा चिंचवड येथे संस्कृती संवर्धन व विकास महासंघ आणि चिंचवड देवस्थान ट्रस्ट, चिंचवड आयोजित सामुदायिक अथर्वशीर्ष पठण उत्साहात संपन्न झाले. (PCMC)
ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ७०० भाविकांच्या मुखातून ऋषिपंचमीच्या सकाळी सात वाजता चिंचवड येथील ऐतिहासिक तीर्थक्षेत्र मंगलमूर्ती वाड्यात अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले.
संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ व चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून ऋषिपंचमीनिमित्त सकाळी सातशे गणेश भक्त, भजनी मंडळ सदस्या यासर्वांनी मुख्य मंडपात अथर्वशीर्ष पठण करत सकाळच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी सभामंडपामध्ये गर्दी केली होती. (PCMC)
अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा १२ वे वर्ष होते. शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत भाविकांनी गणरायाला अभिवादन केले. दरम्यानच्या काळात गायत्री परिवाराच्या माध्यमातून श्री गायत्री गणेश याग संपन्न झाला. आरतीने व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे शुभारंभ दिलीप तांबोळकर यांच्या शंख नादाने झाला.
सुत्रसंचलन किसन महाराज चौधरी यांनी केले, स्वागत रविकांत कळंबकर व डाॕ अजित जगताप यांनी आभार व्यक्त केले.
माजी नगरसेवक सुरेश भोईर व अश्विनी चिंचवडे तसेच राजेंद्र देशपांडे, भास्कर रिकामे, शिवानंद चौगुले आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ’, ‘संस्कृती संवर्धन व विकास महासंघ’ व ‘चिंचवड देवस्थानचे’ प्रमुख कार्यकर्ते, भजनी मंडळ, पतंजली योगचे सदस्य व सन्मा.सभासदानी विशेष प्रयत्न केले.
***

***


***

***

***

***

***




हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती