पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पुणे जिल्ह्यातील बाबाजी भक्त परिवाराचा मेळावा चहोली येथील हॉटेल अशोका व्हेज याठिकाणी संपन्न झाला. (PCMC)
बाबाजींच्या विधीने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी पुणे जिल्ह्यातील जय बाबाजी परिवारातील असंख्य भक्तगण उपस्थित होते. रामानंद महाराजांचा सत्संग व प्रवचन या ठिकाणी झाले त्यांनी आपल्या प्रवचनांमध्ये बोलताना सर्व भक्तांनी बाबाजी च्या पाच परंपरा यांचे अनुकरण करावे, आरोग्याच्या पाच सवयी, श्रमदान अनुष्ठान,गोसेवा, संत सेवा तसेच बाबाजींच्या विधीच्या मंत्राचा लाभ आपल्याला निरोगी ठेवण्यामध्ये कशाप्रकारे उपयोगी पडतो याविषयी प्रवचना मार्गदर्शन केले.
महाराजांनी यामध्ये प्रामुख्याने बाबाजींच्या कामावर श्रद्धा ठेवावी, वर्तमान काळात जगावे, लवकर झोपावे व लवकर उठावे, दररोज विधी वाचन किंवा ऐकावे, दररोज ध्यान करावे, सात्विक आहार घ्यावा, महिन्यातून एकदा श्रमदान करावे, वर्षातून एकदा अनुष्ठान करावे, दररोज सूर्यनमस्कार, आसने, योगा करावे अशा प्रकारच्या संदेश आपल्या भक्तांना त्यांनी प्रवचना मधून दिला. यानंतर ॐ नमो भगवते जनार्दनाय नमः जयघोष करण्यात आला यानंतर बाबाजी ची आरती झाली. यानंतर पुणे जिल्ह्यातील बाबाजी भक्त परिवाराची बैठक संपन्न झाली. (PCMC)

यामध्ये प्रत्येक भक्ताला आपली कामाची जबाबदारी सोपवून देण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन केले होते गुरुबंधू युवराज आहेर यांनी यावेळी त्यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व गुरुबंधूंनी सर्व उपस्थित भक्तांचा आभार मानले व सर्वांनी महाप्रसाद घेण्याचे आव्हान केले.

हे ही वाचा :
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!