Tuesday, March 11, 2025

PCMC : दिव्यांग मुला -मुलींची शाळा अभिराज फाउंडेशन वाकड येथे झेंडावंदन व विविध कार्यक्रम संपन्न

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – वुई टुगेदर फाउंडेशन वतीने नेहमीच या दिव्यांग मुलांची शाळा अभिराज फाउंडेशनला शक्य तेवढी वेळोवेळी मदत केली जाते. (PCMC)

यावेळी वुई टुगेदर फाउंडेशनच्या प्रभारी सचिव मंगला डोळे – सपकाळे, व्यावसायिक मारुती हाके कु. जफीरा सय्यद यांच्या सहकार्याने अभिराज फाउंडेशनच्या मुला – मुलींना, पालकांना, शिक्षक वर्गाला व उपस्थित मान्यवर व नागरिकांना एनर्जी ड्रिंक (ORS) लिक्विड व बिस्कीट वाटप करण्यात आले.

फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष मधुकर बच्चे, माजीअध्यक्ष सलीम सय्यद, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, रोटरी क्लब अध्यक्ष रवींद्र काळे, धनंजय मांडके आदी मान्यवर पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. (PCMC)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

दिव्यांग मुलांचे पालन पोषण करणे ही पालकांची तारेवरची कसरत असते तर त्या मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना योग्य शिस्त लावणे ही शिक्षकांची कसरत असते या सर्वांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस खूप छान प्रगती होताना दिसत आहे ही आनंदाची बाब आहे या दिव्यांग मुलांमध्ये येऊन त्यांचा सहवास व मदत करण्याचा योग म्हणजे पुण्यच मिळते, असे वूई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या वेळी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यश प्राप्त केले त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दिव्या वाजपेयी, रोहित शेणाय, लायन कोकणे, अशोक बनसोडे, या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी दिव्यांग मुला मुलींनी देशभक्ती ची अनेक गीतांवर अप्रतिम नृत्य सादर केले.

अभिराज फाउंडेशन डायरेक्टर रमेश मुसुडगे, स्वाती तांबे यांनी सर्व प्रमुख मान्यवर, पालक वर्ग,नागरिकांचे स्वागत व आभार मानले.

वैशाली खेडेकर, रुपणाळकर मॅडम यांनी सूत्रसंचालन केले

Related Articles

- Advertisement -

Latest Articles