Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : संत सावता महाराज समाधीस्थळ तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करावा

पिंपरी चिंचवड : क्रांतीकुमार कडुलकर : अरण स्थित (ता माढा, जि सोलापूर) येथील संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी स्थळ तीर्थक्षेत्राचा त्वरित विकास आराखडा तयार करावा या मागणीसाठी संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या शिस्ट मंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून चर्चा केली. PCMC NEWS

---Advertisement---

या पिंपरी चिंचवड शहरातील शिष्टमंडळात संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष सावता महाराज वसेकर, सचिव प्रभू महाराज माळी, विश्वस्त साखरचंद महाराज लोखंडे, अमित जावळे, गणेश जांभूळकर यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणूकीची धावपळ असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच सुमारे अर्धा तास चर्चा केली. असता त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला. या कार्यासाठी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार डॉ अमोल कोल्हे, आ.जयकुमार गोरे, आमदार देवयानी फरांदे, आ. योगेश टिळेकर, उद्योजक अनिल जाधव यांनी देखील शिष्टमंडळाला वेळोवेळी सहकार्य केले. PCMC

यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथे सागर बंगला या ठिकाणी भेट घेतली असता, लवकरच हा विषय मार्गी लावला जाईल. असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. या मागण्या पुढीलप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम समाजबांधवांचे दैवत असलेले संत सावता महाराजांच्या संजीवन समाधी स्थळाला राज्यभरातील भाविक भेट देत असतात.

अराण येथील संत सावता महाराज मंदिराचा (savata maharaj) जीर्णोद्धार, भक्त निवास, अन्न क्षेत्र, आरोग्यकेंद्र,बस स्थानक, मुबलक पाणी उपलब्धता, संत सावता महाराज अभंग वाड्मय व आयुर्वेदीक संशोधन केंद्राची उभारणी करण्यात यावीत, हि मागणी गेली ६ महिन्यापासून करीत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

---Advertisement---

धक्कादायक : ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles