Wednesday, February 5, 2025

ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांचा मोठा भाऊ आणि 17 एलजेडी नेत्यांचा कम्युनिस्ट पक्षात प्रवेश

Photo : Facebook/comrade

तिरुअनंतपुरम ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांचा मोठा भाऊ आणि 17 एलजेडी नेत्यांनी कम्युनिस्ट प्रवेश केला आहे. लोकतांत्रिक जनता दल (एलजेडी) चे प्रदेशाध्यक्ष एमव्ही श्रेयम्स कुमार यांच्याशी झालेल्या वादानंतर हा पक्ष प्रवेश झाल्याचे समजते.

शुक्रवारी तिरूअनंतपुरम येथे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांच्या उपस्थित एलजेडी चे शेख पी. हरिझ आणि बैजू पुकुट्टी यांचा समावेश आहे. बैजू पुकुट्टी, जो ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टीचा मोठा भाऊ आहे.

10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! परिक्षेच्या सरावासाठी मिळणार Question Bank !

शेख पी हरिझ हे एलजेडीचे राज्य सरचिटणीस हे लोकांमध्ये प्रिय होते. प्रवेश केलेल्या मध्ये अंगथिल अजयकुमार, बी राजेश प्रेम, टीव्ही सुकुमारन, केके बाबू, एमए टॉमी, एनव्ही श्याम, एओ शानवास, एव्ही खालिद, पूवाचल नस्सर, अॅड सुरेश, शामनाद रहीम, मेनका बालकृष्णन, जमील के, सुरक्षित पी हरिस यांचा समावेश आहे.

सीपीएमचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन म्हणाले की, “सीपीएम जिल्हा समित्या पाहणी करतील आणि त्यांना जबाबदाऱ्या देतील. पक्षाचे राज्य सचिवालय एलजेडीमध्ये राज्यस्तरीय पदे भूषविणाऱ्यांच्या भूमिकेवर निर्णय घेईल,” असेही ते म्हणाले.

धक्कादायक : दलित तरुणांने मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतल्याने दलित समाजावर टाकला बहिष्कार

शेख पी हॅरीझ म्हणाले की, एलजेडी सदस्यांनी डिसेंबरच्या मध्यात सीपीएमचा भाग होण्याचा निर्णय घेतला होता आणि कोडिएरी आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांचे खुल्या हातांनी स्वागत केले. याबाबतचे सविस्तर वृत्त onmanoram.com या वेबसाईटने दिले आहे.

यंत्रणेची बेपर्वाई आणि सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष; हेच बांधकाम कामगारांच्या मृत्युचे खरे कारण – सिटू

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती


Related Articles

- Advertisement -

Latest Articles