पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : संतश्रेष्ठ विश्वगुरू जगतगुरु तुकाराम महाराज मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती,पिंपरी चिंचवड शहर,पुणे व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र महाराष्ट्र-राज्य पुरस्कार प्राप्त अरुण पवार आणि मित्रपरिवार , आदर्श सरपंच, धारूर लोकनियुक्त, धाराशिव जिल्हा तालुका तुळजापूर बालाजी पवार तसेच श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट देवस्थान समिती देहूगाव व माऊली भक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीचा ५००० वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे.
त्याची सुरुवात श्री क्षेत्र भंडारा डोंगर संत तुकाराम जगतगुरू विश्वगुरू संत श्रेष्ठ भंडारा डोंगर पासून ५०० रोपांचे वृक्षारोपण करून सुरुवात करत आहोत तरी सर्व माता-पिता बंधु-भगिनी युवक युवती वृक्षमित्र आपण सर्वानी सहभाग घेऊन वृक्षारोपणाची चळवळ सहभागी होऊन वाढवण्यासाठी सहकार्य करावे व कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे .
दिनांक / वेळ –रविवार दि.09/07/2023 रोजी सकाळी 9 : 15 वा
आयोजक – मराठवाडा जनविकास संघ ( महा.राज्य ) पिंपरी चिंचवड शहर पुणे आणि भंडारा डोंगर देवस्थान समिती ट्रस्ट देहूगाव च्या पुढे चाकण तळेगाव मेन रोड भंडारा डोंगर देवस्थान मेन प्रवेशद्वार शेजारी
लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू
कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा
महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या

