Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धांचे आयोजन

हडपसर / डॉ. अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘सर्जनशीलतेची अभिव्यक्ती’ ही थीम घेऊन महाविद्यालयीन पातळीवर आविष्कार संशोधन प्रकल्पस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या आविष्कार स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ.विकास मठे व प्रोफेसर डॉ.श्रीकृष्ण सरताळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड उपस्थित होते.

प्रोफेसर डॉ. विकास मठे म्हणाले की, प्रत्येकाच्या मनात एक शास्त्रज्ञ लपलेला असतो. नाविन्याचा ध्यास घेऊन महाविद्यालयीन पातळीवर आयोजित केलेल्या या उपक्रमात आपणच आपल्याला सिद्ध केले पाहिजे. प्रोफेसर डॉ. श्रीकृष्ण सरताळे म्हणाले की, निरीक्षण, सातत्य आणि अभ्यास यातून आपण संशोधनात आपले चांगले काम करू शकतो.

---Advertisement---



अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले की, युवकांनी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी संशोधन करावे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर समाजहितासाठी करावा. आपल्याजवळ नाविन्यपूर्ण कल्पना असल्याशिवाय आपणास संशोधनाच्या क्षेत्रात पुढे जाता येणार नाही. असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील 90 विद्यार्थ्यांनी आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी परीक्षक म्हणून उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ.किशोर काकडे, डॉ.शहाजी करंडे, प्रा.संगीता यादव, डॉ.ज्योती किरवे, डॉ.अतुल चौरे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिसर्च कमिटीच्या प्रमुख डॉ. रंजना जाधव यांनी केले. तर आभार डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल पवार, प्रा.मोनिका शेळके यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Lic
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles