बुंदी : राजस्थानमधील बुंदी आणि दाऊसा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या कार्यकाळावर टीका केली आहे. पंतप्रधान चोवीस तास काम करतात, ते आता भारत माता की जय म्हणण्याऐवजी अदानी यांचा जयजयकार करत आहेत. पंतप्रधानांना दोन ‘हिंदुस्थान’ बनवायचे आहेत, एक अदानीसाठी आणि दुसरा गरिबांसाठी, असा आरोपही त्यांनी केला.
देशातील सर्व आर्थिक औद्योगिक धोरणे एका उद्योगसमूहाभोवती फिरत आहेत. देशाचे सरकार 90 प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत, त्यामध्ये आदिवासी व इतर मागास फक्त 7 अधिकारी आहेत. त्यामुळे देशाच्या आर्थिक धोरणामध्ये बहुसंख्य समाजाच्या आर्थिक हिताचे धोरण राबवले जात नाही. फक्त निवडक उद्योगासाठी अर्थकारण पंतप्रधान कार्यालयातून चालवले जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी प्रचार सभेत केला आहे.
देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे
आम्ही राजस्थानमध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचे ठरवले आहे, आपल्या देशातील ओबीसी, आदिवासी, दलित व मागासवर्गीय मुलांना आयएएस बनायचे आहे. देशाच्या बजेटमध्ये ओबीसी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी भागीदारी वाढवण्यासाठी जातीनिहाय जनगणना व्हावी. यावर त्यांनी प्रचारात भर दिला. देश चालवणार्या 90 अधिकार्यांपैकी किती जण ओबीसी,दलित आणि आदिवासी आहेत, असा प्रश्न मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला होता. ते उत्तर देत नाहीत, ते एकटेच ओबीसी असून काय उपयोग, मोदी काहीही झाले तरी जात जनगणना करणार नाहीत. राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षच हे करू शकते असे प्रतिपादन त्यांनी केले.