मुंबई : आज हनुमान जयंतीचे (Hanuman Jayanti 2023) औचित्य साधत या सिनेमातील हनुमानाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे.’आदिपुरुष’ या सिनेमात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे (Devdatta Nage) हनुमानाच्या भूमिकेत आहे. देवदत्तने या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की,”श्रीराम के भक्त और रामकथा के प्राण… जय पवनपुत्र श्री हनुमान!”. आज हनुमान जयंतीनिमित्त ‘आदिपुरुष’ या सिनेमातील हनुमानाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
हनुमानाच्या फर्स्ट लुकआधी रामनवमीला ‘आदिपुरुष’ सिनेमाचं एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यात प्रभास रामाच्या भूमिकेत दिसत होता. तर क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसत होती. आज हनुमान जयंतीचं औचित्य साधत रामभक्त हनुमानाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे.
‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी देवदत्त नागे सज्ज आहे. याआधी बॉलिवूडच्या ‘तान्हाजी’ या गाजलेल्या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आला होता. देवदत्तने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. यात ‘जय मल्हार’, ‘डॉक्टर डॉन’, ‘देवयानी’, ‘बाजीराव मस्तानी’ या मालिकांचा समावेश आहे. जय मल्हार’ या मालिकेमुळे तो घराघरांत पोहोचला आणि त्याच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे.
---Advertisement---
---Advertisement---
हनुमान जयंतीनिमित्त ‘आदिपुरुष’ सिनेमातील हनुमानाचा फर्स्ट लुक आऊट पोस्टर रिलीज..
---Advertisement---
- Advertisement -