Sunday, April 13, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सकल मातंग समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने वंचित जाती हक्क परिषद संपन्न

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महाराष्ट्रातील शेकडो मातंग समाजातील संघटना प्रमुखांच्या उपस्थित साळवे गार्डन अप्पर सुपर बिबवेवाडी पुणे येथील मेळाव्यात या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. बैठकीत खालील विषयांवर मंथन व चिंतन करण्यात आले. आद्यगुरू क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या संगमवाडी येथील समाधीस्थळाच्या विकासासाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध करुन घेणे, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करणे आदी विविध सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाच्या विविध योजना मार्गी लावण्यासाठी ११ जुन२०२३ रोजी बिबवेवाडी पुणे या ठिकाणी मातंग समाजातील शेकडो संघटना प्रमुखांच्या उपस्थित महत्वाची बैठक पार पडली‌.

---Advertisement---


या बैठकीत सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक / अध्यक्ष युवराज दाखले यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले मातंग समाजाला अ, ब, क, ड करून स्वतंत्र आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढत असताना कागदोपत्री लढाई शासन दरबारी लढने गरजेचे आहे.महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नावाने निवेदन देवून दबाव वाढवण्यासाठी मदत होईल. तसेच आद्यक्रांतीगुरू क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची समाधीस्थळ संगमवाडी येथील ट्रस्टचे राज्यात विस्तारीकरण करणे गरजेचे आहे असे मत दाखले यांनी मांडले.

या बैठकीचे आयोजन आद्यक्रांतीगुरू क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे समाधीस्थळ संगमवाडी येथील ट्रस्टचे अध्यक्ष अशोक भाऊ लोखंडे व मातंग समाज अन्यायकृती समितीचे भास्कर नेटके यांनी केले. यावेळी शंकर भाऊ तडाखे, भाऊसाहेब अडागळे, युवराज दाखले, मच्छिंद्र सकटे सर, सुभाष रनदिवे, विठ्ठल थोरात, अरूण गायकवाड, मुंबई वरून लहु थोरात , शंकरराव कांबळे, ॲड राम गायकवाड यांच्या सह शेकडो संघटना प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

वारकऱ्यांवरील लाठीमाराने वारीला गालबोट; सखोल चौकशी करून पोलिसांवर कारवाई करा

PCMC विडिओ : हजारो भाविकांनी घेतले दर्शन तुकोबारायांच्या पालखीला भक्ती भावाने निरोप



साहित्यिकांच्या दिंडीने वेधून घेतले भाविक भक्तांचे लक्ष

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles