Thursday, February 13, 2025

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चिंचवड विधानसभेतील अडीचशे युवकांना पदनियुक्ती

युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे शक्तिप्रदर्शन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत चिंचवड विधानसभा क्षेत्रातील सुमारे 250 युवकांची आज पद नियुक्ती करण्यात आली.

चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना विजयी करण्यासाठी आज चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जंबो कार्यकारणी जाहीर केली गेली.

यावेळी चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी उमेश काटे यांची निवड केली गेली. तसेच शहर सरचिटणीस पदी विकास कांबळे यांची तर चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदी सनी माने, तर चिंचवड विधानसभा मुख्य संघटक पदी आकाश घोलप तर चिंचवड विधानसभा सरचिटणीसपदी प्रशांत कांबळे यांची निवड केली गेली. यावेळी 14 प्रभाग अध्यक्ष आणि 42 वॉर्ड अध्यक्ष याची नियुक्ती केली गेली. तसेच विविध प्रभागातील वॉर्ड उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव अशी 200 हून जास्त पद नियुक्ती आज युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केली.

कोणत्याही निवडणुकीमध्ये उमेदवार जिंकवण्याची सर्वात मोठी जबाबदारी युवकांची असून पिंपरी चिंचवड शहरातील युवक हि जबाबदारी सक्षमपणे पार पाडताना दिसत असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ही विधानसभा पोटनिवडणूक युवकांनी आपल्या खांद्यावर घ्यावी अश सुचना देखील जयंत पाटील यांनी युवक अध्यक्ष इम्रान शेख यांना केल्या.

या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील असंघटित तरुण, बेरोजगार तरुण, बहुजन तरुण, सुशिक्षित तरुण, यांना एकत्रित करून महविकास विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सक्रिय पणे काम करेल अशी ग्वाही इम्रान शेख यांनी दिली.

या पद नियुक्ती सोहळ्याचे आयोजन कार्याध्यक्ष निलेश निकाळजे उपाध्यक्ष ओम शिरसागर, दिनेश पटेल, साहिल शिंदे, रुबान शेख, केतन होके, मेघराज लोखंडे, ऋतिक भुजबळ, अभिषेक जगताप या युवक पदाधिकाऱ्यांनी केले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles