Thursday, February 13, 2025

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ- पिंपरी कार्यालयाच्या वतीने 74 व्या प्रजासत्ताक दिनी पर्यावरणाची शपथ

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:पिंपरी येथील संत तुकाराम नगर मधील कामगार कल्याण केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा मुळे हर घर तिरंगामुळे भारतभर देशभक्ती जागृत होत आहे. 1950 ला संविधान दिन लागू झाले पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून  करण्यात येते  तो हाच दिवस आहे.

यावेळी गुणवंत कामगार अण्णा जोगदंड म्हणाले की कामगार कल्याण मंडळांनी शिष्यवृत्ती योजना, परदेश उच्च शिक्षण योजना, क्रीडा शिष्यवृत्ती ,सह विविध पुरस्कार, नाट्य स्पर्धा, भजन स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, शिवण क्लास ,शिशु मंदिर, वैद्यकीय अर्थसाह्य ,रोजगार मेळावा, यूपीएससी, एम.पी.एस.सी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन शिबिर याचबरोबर आरोग्य शिबिर, फॅशन डिझाईन,  कराटे प्रशिक्षण, योगा वर्ग,चित्रकला, ब्युटी पार्लर सारखे वर्ग अशा प्रकारचे उपक्रम हे स्थानिक कामगाराच्या मागणीनुसार उपक्रम मंडळ राबवीत असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.

यावेळी डायनोमर्कचे विभाग प्रमुख हेमंत नेमाडे म्हणाले की भारताची जगात पाचवी क्रमांकावर अर्थव्यवस्था आली आहे. भारतीय नागरीकानी पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी अधिक अधिक सर्व क्षेत्रात सहभाग नोंदवला पाहिजे.

बाल हक्क  कार्यकर्त्या डॉ. यामीनी आडबे यांनी सांगितले की, उद्याचा भारत घडवण्यात जास्तीत जास्त स्त्रिया योगदान देतील यात शंका नाही.जोपर्यंत भीक मागणारे लहान लहान मुले मुख्य प्रवाहात येत नाहीत तो पर्यंत भारत महासत्ता होईल असे मला वाटत नाही.केंद्राच्या उपसंचालिका सुरेखा मोरे,डी.वाय.पाटीलचे सब रजिस्टार राम डोके,केंद्र संचालक किरण कोळेकर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अरुण इंगळे यांनी संविधान देऊन पर्यावरणाची शपथ दिली.
यावेळी गुणवंत कामगार आण्णा जोगदंड,महिला अध्यक्षा संजना करंजावणे, केंद्र संचालक अनिल कारळे कोळेकर, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड, केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे,हेमंत नेमाडे ,गुणवंत कामगार शिवराम गवस, शंकर नानेकर,किरण देशमुख, काळुराम लांडगे, शामराव गायकवाड, कवी शामराव सरकाळे,ईश्वर सोनोने, पंडीत वनसकर,प्रकाश घोरपडे ,यादव तळोले,सुदाम शिदे,सा.का किरण कोळेकर, आभिजीत ओव्हाळ,बबन मगर ,क्षिरसागर संगिता, अवडे शैलेजा,ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles