Saturday, March 15, 2025

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तानसा तलाव परिसरात विजय दिनाची सभा संपन्न

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

शहापूर : भारताचा कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सवादी) व अखिल भारतीय किसान सभा शहापूर तालुका कमिटीच्या वतीने तानसा तलाव परिसरात विजय दिनाची सभा संपन्न झाली.

शहापूर तालुक्यातील तानसा तलाव परिसरात २९ वर्षां पूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर २४ जून हा विजय दिन म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या गावात सभा घेऊन साजरा केला जातो. त्यानुसार  शिसवली या  गावी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रभावी विजय दिन साजरा करण्यात आला. 

२९ वर्षांपूर्वी २४ जून १९९२ साली वन विभागाचे अधिकारी आणि पोलीसांनी येथील जमिनी कासणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांवर दहशत बसवून त्यांना हाकलून देण्यासाठी अमानुष गोळीबार केला होता. त्यात कॉ.रघुनाथ भुरभुरा यांच्या छातीतून गोळी आरपार निघून गेली, त्यांना लगेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उचलून मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केले व त्याचा प्राण वाचवले. इतरही अनेक जण या गोळीबारात जखमी झाले. पण तरीही शेतकरी आदिवासींनी मागे न हटता जोरदार प्रतिकार केला आणि जुलमी पोलीस व फॉरेस्ट च्या अधिकाऱ्यांना पळवून लावले, असा इतिहास आहे. 

आज २९ वर्षांनंतरही येथील आठ गावांच्या जमिनीवर शेकडो आदिवासी शेती करत आहेत. तसेच कसत असलेल्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी वनाधिकार कायद्याखाली त्यांनी दावे केले आहेत. 

या सभेत उपस्थित असलेले १९९२ च्या लढेत अग्र भागी असलेले कॉ.रघुनाथ भुरभुरे, सभेचे अध्यक्ष कॉ.सुनील करपट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ठाणे-पालघर जिल्ह्याचे सचिव कॉ.बारक्या मांगात, अखिल भारतीय किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष कॉ.किसन गुजर, माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. किरण गहला, माकप शहापूर तालुका सचिव कॉ.भरत वलंबा, किसान सभेचे तालुका सचिव कॉ.कृष्णा भावर, सीटू चे तालुका सचिव कॉ. विजय विशे, एसएफआय ठाणे-पालघर जिल्ह्याचे सचिव कॉ.भास्कर म्हसे, जमस च्या तालुका अध्यक्ष कॉ. सुनीता ओझरे, व तालुका सचिव कॉ.निकिता काकरा, माकप तालुका सदस्य कॉ.नंदू खांजोडे, कॉ.सुभाष टोकरे ह्या वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व डी वाय एफ आय चे तालुका सचिव कॉ.नितीन काकरा, कमल वलंबा आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

- Advertisement -

Latest Articles