Wednesday, April 24, 2024
Homeग्रामीणबीड : वटपौर्णिमा निमित्त महिलांकडून वडाच्या वृक्षाचे वृक्षारोपण

बीड : वटपौर्णिमा निमित्त महिलांकडून वडाच्या वृक्षाचे वृक्षारोपण

परळी वै : हिंदू पंचागातील जेष्ठ महिन्यात संपन्न होणार्‍या पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व असून पतीच्या दीर्घायुष्य व सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी तमाम हिंदू महिलांकडून वट वृक्षांची पूजा केली जाते. पतीच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी व्रत राखले जाते. याच दिनानिमित्ताने तालुक्यातील मौजे भिलेगाव येथील असंख्य महिलांनी गावाजवळ 151 वडांचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी केली. 

पुरातण काळातील सावित्री ने यमराजा कडून आपला पती सत्यवान याचे प्राण महत प्रयासाने वाचवल्याचा इतिहास असून तेव्हा पासून वटपौर्णिमा रूढ झाली आहे.वटवृक्षा चे आयुष्य जास्त असून पारंब्या मुळे विस्तार ही खूप मोठा असल्याने अश्या वडाच्या झाडाची पूजा केली जाते. परंतु काळाच्या ओघात वृक्ष तोड मोठया प्रमाणात होत असल्याने निसर्गाचा समतोल बिघडला असून याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज असून या निमित्ताने प्रत्येकी एक जरी वृक्ष लावला तर तीच खरी वटपौर्णिमा साजरी करण्यासारखे आहे.

यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होणार असून केवळ दिखावा म्हणून नव्हे तर एक कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. हीच काळाची गरज ओळखून तालुक्यातील मौजे भिलेगाव येथील महिला सरपंच तारामती संभाजी माने, उपसरपंच गोदावरी बालाजी कडभाने यांच्या पुढाकाराने गावात महिलांनी स्वतः खड्डे खोदत 151 वडाच्या वृक्षाचे तर इतर 100 वृक्षाचे वृक्षारोपण केले.

यावेळी गावातील सुशिक्षित व निसर्गप्रेमी महिला सर्व इंदुमती कडबाने, शितल कडभाने, वसंता कडभाने, कुषावर्ता कडबाने, भागुबाई कडबाने, रेखा कडभाने, सिंधू कडभाने, शारदा कडभाने, राणी कडभाने, सविता कडभाने, अनिता चव्हाण, आयोध्या कडबाने, आशा कडभाने, महानंदा कडबाने आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय