बिग बॉसच्या बहुचर्चित 16 व्या सिजनला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या घरात अनेक बहुचर्चित सदस्यांनी हजेरी लावलेली आहे. परंतु यंदाच्या या सिजनमध्ये आणखी एक हटके एन्ट्री होणार असल्याचं दिसून आलं आहे. यंदाच्या सीजन मध्ये पुण्यातील गोल्डन बॉय अशी ओळख असणाऱ्या ‘सनी नानासाहेब वाघचौरे’ लवकरच सलमान खानच्या घरात एंट्री करणार आहे. स्वतः सनी याने इंस्टग्रामच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे.
सध्या ‘बिग बॉस 16’चा हा 8 वा आठवडा सुरु असून, प्रेक्षक देखील गेल्या अनेक दिवसांपासून वाइल्ड कार्ड एन्ट्रीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि अश्यातच म्हणजेच, आज रात्री बिग बॉसच्या घरात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. याचा अधिकृत प्रोमो देखील बिग बॉसने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
दरम्यान, तुम्ही हा प्रोमो पहिला तर लक्षात येईल की आज बिग बॉसच्या घरात पुण्याच्या गोल्डन बॉयची सलमानच्या घरात धमाकेदार एन्ट्री होत आहे. त्यानंतर घरातील काही काही सदस्यांशी आपली ओळख देखील करून देत असल्याचं पाहायला मिळत आहे. बॉग बॉसच्या यंदाच्या सिजनला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे.
दरम्यान, पुण्यातील पिंपरी शहरात राहणार सनी नानासाहेब वाघचोरे हा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असून, त्याचे इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. मात्र, खऱ्या अर्थाने ते त्यांच्या लक्झरी जीवनशैलीसाठी ओळखले जातात आणि आता ते पहिले वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून टीव्हीच्या सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये प्रवेश करत आहे.


