Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आता महापौरही राष्ट्रवादीचा आणि मुख्यमंत्रीही राष्ट्रवादीचाच ! – अजित गव्हाणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापनदिनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा एकजुटीने निर्धार

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि. 10
– येत्या महानगरपालिका निवडणुकीत तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरणार असून आता पिंपरी-चिंचवडचा महापौर राष्ट्रवादीचा असेल आणि मुख्यमंत्रीही राष्ट्रवादीचाच असणार, असा ठाम निर्धार पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला. पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गव्हाणे बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शहर महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, संगीता ताम्हाणे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, प्रवक्ते विनायक रणसुभे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

---Advertisement---



पुढे बोलताना अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले,” शरद पवार यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची 25 वर्षांची वाटचाल त्यांच्याच मार्गदर्शनाने आणि विचाराने दैदिप्यमान अशी सुरू आहे. लहान खेडी एकत्र करून आंतरराष्ट्रीय ख्यातीची महापालिका बनवण्यात शरद पवार, अण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासह अजित पवार यांचा मोलाचा वाटा कोणीही नाकारू शकणार नाही. अजित पवारांनी तर पिंपरी-चिंचवड शहराचा केवळ कायापालटच केला नाही तर या शहराला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कामगिरीला जनताही नाकारू शकणार नाही. त्यामुळेच यंदाची महापालिका निवडणूक आपण सर्वांनी एकजुटीने लढायची आहे. शहराची सध्या होत असलेली वाताहत थांबवायची असेल तर राष्ट्रवादीचाच महापौर निवडून आणावा लागेल. त्याचबरोबर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचे असेल तर सर्वांनी एकजुटीने निर्धार करण्याची वेळ आली आहे. ही लढाई खोट्या लोकांविरुद्ध खऱ्या लोकांची असेल.”

या कार्यक्रमास माजी नगरसेवक विक्रांत लांडे, प्रवीण भालेकर, तानाजी खाडे, विजय लोखंडे, प्रकाश सोमवंशी, ॲड. गोरक्ष लोखंडे, राजेंद्र साळुंखे, दीपक साकोरे, संजय औसरमल, अकबर मुल्ला, देवेंद्र तायडे, विशाल काळभोर, प्रशांत सपकाळ, दत्तात्रय जगताप, राजू लोखंडे, धनंजय भालेकर, देविदास गोफणे, कविता खराडे, मनीषा गटकळ, निर्मला माने, गंगा धेंडे, संगीता कोकणे, ज्योती तापकीर, सविता धुमाळ, श्रीधर वाल्हेकर, काशिनाथ जगताप, संदीप तापकीर, संग्राम चव्हाण, ज्ञानेश्वर कांबळे, राजन नायर, तुकाराम बजबळकर, विजय दळवी, बाळासाहेब पिल्लेवार, प्रदीप गायकवाड, सुदाम शिंदे, महेश माने, नीलम कदम, राजू चांदणे, सचिन वाल्हेकर, पोपट पडवळ, राजेश हरगुडे, सारिका हरगुडे, युवराज पवार, दत्ता बनसोडे, सुभाष गावडे, ॲड. विशाल जाधव, अनिल शिंदे, राजू म्हत्रे, अंकश दिघे, नवनाथ डफळ, इमरान शेख, सुलेमान शेख, जावेद शेख, शक्रुल्ला पठाण, रवींद्र सोनवणे, ज्योती गोफणे, मीरा कदम, सुप्रिया सोळांकुरे, आशा मराठे, मेघा पळशीकर, पूनम वाघ, सपना कदम, आशा सावंत, रिजवाना सय्यद, उषा उभारे, संजीवनी पुराणिक, निता गायकवाड, जयश्री पाटील, नीलम कदम इत्यांदीसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यातील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी भारताला मिळाले अकरा सुवर्णपदक

स्पाईन रोड : जागरूक नागरिकाच्या तत्परतेमुळे प्रशासनाने मोठा खड्डा बुजवला

केंद्र सरकार पुरस्कार प्राप्त रोजलँडच्या चेअरमनसह संपूर्ण संचालक मंडळ पुनर्स्थापित

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles