Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का, शिवसेना कुणाची…

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठा समोर सुनावणी आज पार पडली. घटनापीठा समोरील पहिल्याच दिवशीच्या सुनावणीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

---Advertisement---

राज्यातील सत्ता संघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र त्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्हावर कुणाचा अधिकार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाला घेता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे तर शिंदे गटाला यामुळे मोठा दिलासा मानला जात आहे.

या आधी ठाकरे गटाला आपली कागदपत्रं जमा करण्याचे निर्देश हे निवडणूक आयोगाने दिले होते. त्यावर ठाकरे गटाकडून दोन वेळा मुदतवाढीची मागणी केली होती. त्यामुळे आता पुन्हा ठाकरे गट कागदपत्रं जमा करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात येणार का हे पाहावं लागणार आहे. शिवसेना कुणाची याचा निर्णय येत्या महिना किंवा दीड महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

---Advertisement---

दरम्यान, शिवसेना नेमकी कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने द्यावा असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला. तर निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, निवडणूक आयोगाचे काम हे विधानसभा अध्यक्षांच्या कामापेक्षा वेगळं आहे असा युक्तीवाद केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील अॅड. दातार यांनी केला.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles