Thursday, April 25, 2024
Homeजिल्हागेलेली सत्ता कधीही येऊ शकते - जयंत पाटील

गेलेली सत्ता कधीही येऊ शकते – जयंत पाटील

आढावा बैठकीत गैरहजर नगरसेवकांची झाडाझडती

पिंपरी चिंचवड : राज्यातील सत्ता गेल्यामुळे आता यांचे काही खरं नाही, असे म्हणून जर नगरसेवक आढावा बैठकीस हजर रहात नसतील तर त्यांना सांगतो, गेलेली सत्ता कधीही येऊ शकते. प्रत्येकाचा टाइम कधीही बदलू शकतो, असे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गैरहजर नगरसेवकांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच गैरहजर नगरसेवकांचा यादी पाठवा, अशी सूचना पाटील यांनी केली.

काळेवाडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित सभासद नोंदणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, महिलांच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, शहर महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, फजल शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्यारम लांडे, चिंचवडचे अध्यक्ष विनोद नढे, भोसरीचे पंकज भालेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, शमीम पठाण, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय