मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा झटका देताना शेतकरी कर्जमाफीची शक्यता स्पष्टपणे नाकारली आहे. (No loan waiver) बारामती येथे आयोजित एका शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत पीक कर्जाची रक्कम बँकेत जमा करण्याचे आवाहन केले.
अजित पवार यांनी “सगळी सोंगं करता येतात, पण पैशांचं सोंग करता येत नाही,” असे म्हणत राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा दाखला दिला. तसेच “या वर्षी आणि पुढील वर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या विधानामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (हेही वाचा – मोठी बातमी : व्लादिमीर पुतिन यांच्या आलिशान कारमध्ये मोठा स्फोट)
शेतकऱ्यांमध्ये निराशा आणि संभ्रम | Ajit Pawar
अजित पवार यांच्या या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. “निवडणुकीत आम्हाला कर्जमाफीचं स्वप्न दाखवलं, आता सत्तेत आल्यावर कर्ज भरा म्हणतायत. ही तर आमची फसवणूक आहे,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असूनही, सततच्या दुष्काळ, कमी भाव आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफीच्या अपेक्षेने अनेकांनी कर्जाची परतफेड थांबवली होती. मात्र, आता 31 मार्चची मुदत आणि कर्जमाफी नाकारल्याने त्यांच्यासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. (हेही वाचा – ‘लापता लेडीज’साठी आमिर खानचा ऑडिशनचा व्हिडिओ व्हायरल, एकदा बघाच !)
शेतकऱ्यांसमोरील पर्याय काय?
अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत कर्ज फेडण्याचे आवाहन केले असले, तरी त्यांनी एका योजनेचा उल्लेख केला. “जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतील, त्यांना शून्य टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध होईल,” असे ते म्हणाले. मात्र, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की, कर्ज फेडण्यासाठी पैसेच नसतील, तर ही योजना कशी उपयोगी ठरणार? (हेही वाचा – गुढीपाडव्याच्या आधीच सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, वाचा आजचे दर)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या विधानाचे समर्थन करताना म्हटले, “कर्जमाफी कधीच होणार नाही, असे आम्ही म्हणालो नाही. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.” असे म्हणाले.