Thursday, November 21, 2024
Homeकृषीयेत्या दोन दिवसांत राज्यात प्रामुख्याने ढगाळ हवामान !

येत्या दोन दिवसांत राज्यात प्रामुख्याने ढगाळ हवामान !

पुणे : येत्या दोन दिवसांत मान्सूनचा प्रवास दक्षिण अरबी समुद्राकडे तसेच बंगालच्या उपसागराच्या दक्षिण व मध्य भागात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तसेच उत्तर तमिळनाडूच्या अंतर्गत तसेच त्या सभोवतीच्या भागात असलेल्या चक्रवाताची स्थिती कायम आहे. परिणामी गेल्या चोवीस तासांत कर्नाटकची किनारपट्टी, अंतर्गत कर्नाटक व केरळ काही ठिकाणी मुसळधार व तमिळनाडूत काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस झाला.

हेरवाड गावचा नवा आदर्श ; महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद ,शासन निर्णयाचे सर्वत्र स्वागत !

राज्यातही पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तसेच कोकणात शुक्रवारी (दि. २०) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर दक्षिण कोकण व गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

आज केरळ आणि तामिळनाडूजवळ पावसाचे ढग दिसत नाहीत. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रसह मराठवाडा आणि संपूर्ण गोव्यासह कर्नाटकच्या बहुतांश भागांत आणि अरबी समुद्रावर काही भागात ढगाळ वातावरण आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यातही अंशत: ढगाळ वातावरण असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आज जागतिक मधमाशी दिन ; विशेष लेख !

संबंधित लेख

लोकप्रिय