NEET Result : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज NEET 2024 चा निकाल जाहीर केला आहे. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) ही परीक्षा लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. यंदाच्या वर्षी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने निकालाची प्रतीक्षा केली होती, आणि अखेर त्यांच्या प्रतीक्षेचा काळ संपला आहे.
असा पहा निकाल NEET Result
परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून, विद्यार्थी आपले निकाल exam.nta.ac.in/NEET या वेबसाइटवर तपासू शकतात. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना exam.nta.ac.in/NEET वेबसाइटला भेट द्या, पुढे होमपेजवर NEET 2024 लिंक पहा आणि त्यावर क्लिक करा. यानंतर तुमचे ID लॉगिन करा. पुढे NEET 2024 स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल. नंतर स्कोअरकार्डचे पुनरावलोकन करा आणि डाउनलोड करण्यासाठी पुढे जावा. शेवटी स्कोअरकार्डची हार्ड कॉपी प्रिंट करा.
दरम्यान, NTA ऑल इंडिया टॉपर्सची नावे देखील घोषित करेल. पुढे श्रेणीनुसार कट-ऑफ गुण आणि पर्सेंटाइल रँक प्रदान करेल. तसेच या वर्षीच्या परीक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच, ज्यांना अपेक्षित निकाल मिळाला नाही त्यांच्यासाठीही अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्यांना त्यांच्या करियरमध्ये पुढे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
NEET 2024 च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा खूप जास्त होती, ज्यामुळे स्पर्धा देखील अधिक तीव्र होती. या निकालामुळे विद्यार्थ्यांचे वैद्यकीय क्षेत्रात करियर घडवण्याचे स्वप्न साकार होईल. यंदा परीक्षेतील कट-ऑफ गुण देखील वाढले आहेत, असे NTA ने जाहीर केले आहे.
NTA ने सर्व परीक्षार्थींच्या कष्टांचे कौतुक केले आहे आणि त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पुढील प्रक्रियेसाठी सज्ज होणे आवश्यक आहे.


हेही वाचा :
रायगड लोकसभेत सुनील तटकरे विजयी, अजित पवार गटाला केवळ एक जागा
नांदेड लोकसभेतून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी, भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव
कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांचा मोठा विजय, तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी
नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी, हेमंत गोडसे यांचा पराभव
धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांचा ३ हजार ८३१ मतांनी विजयी
ब्रेकिंग : राज्यातील सर्व विजयी 48 खासदार उमेदवारांची यादी, पाहा !
दिल्लीत मनोज तिवारी यांच्याकडून कन्हैया कुमार यांचा पराभव
पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी, तर धंगेकर आणि मोरेंना किती मते मिळाली पहा !
ब्रेकिंग : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन्ही मतदारसंघातून विजय
ब्रेकिंग : उत्तर मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्वल निकम यांचा पराभव
ब्रेकिंग : मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांचा विजय तर संजोग वाघिरे यांचा पराभव
मोठी बातमी : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव
मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव
ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर
ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर
सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण