Sunday, April 6, 2025
---Advertisement---
---Advertisement---

प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सुरक्षा ऑडीट आणि सतर्कतेबाबत उपाययोजना करण्याची गरज – आमदार महेश लांडगे

पुणे : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी (पिंपरी-चिंचवड) येथे मंगळवारी एका टेम्पो ट्रॅव्हल्स वाहनाला भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी झालेले हे सर्वजण आयटी कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Mahesh Landge)

---Advertisement---

भोसरी विधानसभेचे आमदार आणि भाजपाचे नेते महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या दुर्घटनेने आयटी आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे त्यांनी नमूद केले.

या दुर्घटनेनंतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “वाहनांचे नियमित सुरक्षा ऑडिट आणि वाहनचालक तसेच सहायक यांच्या सतर्कतेबाबत कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे मत आमदार लांडगे यांनी व्यक्त केले. यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली असून, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

---Advertisement---

ही घटना हिंजवडीसारख्या व्यस्त औद्योगिक क्षेत्रात घडल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आगीचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles