Friday, March 14, 2025

जुन्नर : शरद पवार यांच्या निवासस्थानावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध !

जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा जुन्नर तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालय येथे तीव्र निषेध करण्यात आला. तसेच हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार अतुल बेनके म्हणाले, गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांकडून भडकवले जात आहे, द्वेषाचं वातावरण तयार करण्यात येत आहे. एसटी कर्मचारी व पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या ४० – ५० वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांचे एकही अधिवेशन पवार साहेबांनी कधीही चुकवले गेले नाही. 

संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण

मोठी बातमी : गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी, तर कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

राज्यात ज्या ज्या वेळी कष्टकरी, कामगारांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांना समजून घेऊन ते सोडवण्यासाठी पवार साहेबांनी सदैव प्रयत्न केले आहेत. मात्र एसटी संप आंदोलनात कर्मचाऱ्यांना चुकीचा रस्ता दाखवला जात आहे आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या प्रवृत्तीच्या मागे जाऊ नये. कालच्या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला गेला आहे, असेही बेनके म्हणाले.

तसेच या घटनेचा तीव्र निषेध जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, जेष्ठ नेते तानाजी बेनके, पीडीसी बँक चे संचालक संजय काळे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, महिला अध्यक्ष उज्वला शेवाडे, जुन्नर शहर अध्यक्ष पापा खोत, अल्पसंख्याक अध्यक्ष अकबर भाई, गटनेते नगर सेवक फिरोज पठाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोरोना उद्रेक : ‘या’ देशात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, तर चुंबन आणि एकत्र झोपण्यावरही बंदी

..तर एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ

आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागांसाठी भरती


Related Articles

- Advertisement -

Latest Articles