Photo : file |
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉर्डिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाकडून सध्या तरी कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही.
मनी लॉर्डिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. आपली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा मलिक यांनी करत तात्काळ जेलमधून सुटका करण्याचा याचिका न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.
राज्यात बरसणार पाऊस, ‘या” जिल्ह्यांना अलर्ट जारी
न्यायालयाने मलिक यांना 18 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे मलिक यांना रमजान काळात कोठडीत राहावं लागणार आहे. अंतरिम दिलासा देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मात्र, न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्याने नवाब मलिक यांच्या न्यायालयाच्या सुविधाही वाढल्या आहेत. न्यायालयीन कोठडीदरम्यान त्यांना घरचे जेवण आणि औषधे दिली जाऊ शकतात, असे न्यायालयाने सांगितले. याआधी नवाब मलिक यांना बेड, खुर्च्या आणि गाद्यांसह इतर सुविधांसाठी मान्यता देण्यात आली होती.
पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका सुरूच, महागाई सुध्दा प्रचंड वाढण्याची शक्यता