Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

“पहिला कोरोना बाधित झालेला कुत्रा न्युयॉर्कमध्ये मरण पावला” यासह आजच्या देशविदेशातील टॉप 10 बातम्या वाचा एका क्लीक वर

---Advertisement---

देश विदेश

१) इराणच्या सर्वोच्च नेते अय्यातुल्ला अली खामनेई यांनी ते अमेरिकेबरोबर कोणत्याही प्रकारची द्विपक्षिय चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले

---Advertisement---


तेहरान, इराण: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणबरोबर कोणत्याही अटी शिवाय चर्चा करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नसून त्यांनी इराण विरूद्ध नेहमी प्रचार करून इराणवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

२) अमेरिकेने पाकिस्तानला अमेरिकेच्या नागरिकाची पाकिस्तान कोर्टात झालेल्या हत्येचा लगेच तपास करण्यात यावा असे सांगितले


इस्लामाबाद, पाकिस्तान: अमेरिकेच्या नागरिकाला पाकिस्तानमध्ये झालेल्या अटकेनंतर त्याची कोर्टमध्ये झालेल्या हत्येचा तपास करण्यात यावा म्हणुन विनंती केली. तसेच कोणत्याही देवाची निंदा करणाऱ्यांवर लावण्यात येणाऱ्या कायद्यात सुधारणा कराव्यात अशी ही विनंती अमेरिकेकडून करण्यात आली.

३) व्हिएतनाममध्ये प्रथमच एका दिवसात जास्त कोरोनाबाधित रूग्ण आढळले


हानोई, व्हिएतनाम: मागिल आठवड्यात व्हिएतनामच्या दानांग शहरात ३ महिन्यात प्रथमच कोरोनाबाधित आढळल्याने तेथील सरकारने शहरबंदीचे आदेश दिले होते. तसेच आज दिवसभरात प्रथमच ४५ कोरोनाबाधितांची नोंद झाली.

४) हॉगकॉगने कोरोना प्रार्दुभाव पाहता निवडणूक एक वर्ष पुढे ढकलली


हॉगकॉग, चीन: ही निवडणूक प्रथमच नवीन सुरक्षा कायदा चीनने लादल्यानंतर होणार होती. त्यामध्ये लोकशाहीवादी विरोधी पक्ष मोठ्याविजयाची अपेक्षा करत होता कारण हॉगकॉगच्या कायदेमंडळात चीनच्या सरकारकडून मोठ्याप्रमाणात नेमणूका करण्यात आल्या आहेत.

५) फ्रान्सची अर्थव्यवस्था मंदीच्या कक्षेत, अर्थव्यवस्थेने दुसऱ्या त्रिमाहीत १४% नी घसरण दर्शविली

---Advertisement---


पॅरिस, फ्रान्स: फ्रान्सने प्रथमच दुसऱ्या त्रिमाहीत १४% ची घसरण दिसली. त्यामागे मे आणि जुन मध्ये लावण्यात आलेले शहरबंदीचे आदेश असल्याचे कारण सरकारने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ३० हजार ००० पेक्षा जास्त लोक फ्रान्समध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत. 

६) चीनने त्यांची सॅट नावाची सॅटेलाईट नेव्हिगेशन यंत्रणा पूर्ण करून कार्यांन्वित केली


बीजिंग, चीन: चीन त्यांची महत्वाकांक्षी जागतिक नेव्हिगेशन यंत्रणा पूर्ण करत कार्यांन्वित केली. ही यंत्रणा अमेरिकेच्या GPS यंत्रणेला तोड देण्यासाठी चीनने बनवली असल्याची सुरक्षा तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

७) ब्रिटनच्या संगीत गायकाला त्याच्या हिंसात्मक बलात्कारासाठी २४ वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली


लंडन, ब्रिटन: ब्रिटनच्या ॲन्डी ॲनोकिए नावाच्या गायकाला त्याने २१ हिंसात्मक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली २४ वर्षाच्या कैदीची शिक्षा ठोठावली. तसेच त्यावर केलेल्या प्रथम बलात्काराच्या तक्रारींपैकी ५ तक्रारी खोट्या असल्याचे सिध्द झाले आहे.

८) ऑस्ट्रेलिया फेसबुक आणि गुगलला पत्रकारीतेला बसलेल्या फटक्याची भरपाई करायला लावणार


सिडनी, ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियाने फेसबूक आणि गुगला बातम्याच्या रकान्यांमूळे बंद पडत चाललेल्या पत्रकार कंपन्यांना भरपाई द्यायला लावणार आहे. कोरोना प्रार्दुभावामुळे असलेल्या शहरबंदीचा मोठ्या प्रमाणात गुगल आणि फेसबुकला जाहिरातीच्या माध्यमातून फायदा झालेला असल्याचे समोर आलेले आहे. तसेच शहरबंदीमुळे ऑस्ट्रेलियामधील खुप पत्रकारांच्या कंपन्या बंद कराव्या लागल्या आहे. गुगल आणि फेसबुकला यावर विचार करण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी सरकार देणार आहे.

९) आपत्तीच्या काळात कोरोनावरील लसीतून कोणता नफा मिळवणार नाही: अस्ट्राझेनेका


लंडन, ब्रिटन: अस्ट्राझेनेका कंपनीने त्यांनी दिलेली कोणताही नफा कोरोनावरील लसीतून मिळविणार नसल्याच्या वचनाचा पून्हा उल्लेख केला. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाला कोरोना वरील लस बनविण्यासाठी आलेला खर्च ब्रिटनच्या सरकारी तिजोरितून करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

१०) पहिला कोरोनाबाधित झालेला कुत्रा न्युयॉर्कमध्ये मरण पावला.


न्युयॉर्क, अमेरिका: कोरोना हा फक्त मनुष्याला होत नसून तो त्यांच्या संपर्कात आलेल्या प्राण्यांना होऊ शकते हे मार्चमध्ये जगासमोर ज्या कुत्रामुळे आले तो आज कोरोनामुळे मृत्युमुखी पडला. त्याला श्वास घेताना होत असलेला त्रास पाहिल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली होती, त्यातूनच तो कोरोना बाधित झाल्याचा प्रकार समोर आला होता.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles