Saturday, March 15, 2025

नारायणगाव : सरपंचांचा पुढाकार; अखेर रस्ता शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी खुला

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

जुन्नर (पुणे) : नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी नारायणगावमधील १६५ शेतकऱ्यांना येण्याजाण्यासाठीचा रस्ता खुला केल्यानंतर तथाकथित अमोल तांबे प्रकरणावर पडदा पडला आहे.

गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून औटी मळा, डेरे मळा, तांबेमळा येथील अनेक शेतकऱ्यांमध्ये आपल्या शेतात मशागतीसाठी येण्याजाण्याच्या रस्त्यावरून वादविवाद चालू होता. शेती बाबतीत असलेले खटले पिढ्यानपिढ्या चालूच राहतात, परंतु न्यायालयीन लढाईला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी नारायणगावच्या जनता दरबारात कैफियत मांडली आणि ग्रामपंचायत नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी पुढाकार घेऊन तांबे, औटी, डेरे आदी शेतकऱ्यांना आपल्या शेतात मशागतीसाठी येजा करण्याचा रस्ता खुला करून दिला.

पुर्वी ज्या पद्धतीने रस्ता होता, त्याच प्रकारे आज त्या रस्त्याचे काम सुरू झाले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles