Wednesday, February 5, 2025

नांदेड : कोरोना लाॅकडाऊनमुळे शेतकरी संकटात, पैसे अभावी शेतीचे काम खोळंबली, जून महिनाजवळ आला तरी खते, बी-बियाणेसाठी पैसे नाहीत

मुखेड (पवन जगडमवार) : गेल्या १ वर्षा पांसुन मुखेड तालुक्यातील शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. अगोदरच डोक्यावर कोरोनाच संकट असल्याने अनेकदा लाॅकडाऊन ही करण्यात आले. त्यामुळे काम धंदा रोजगार बंद असल्याने पैशाची कणकण भासू लागली. त्याच बरोबर गेल्या वर्षी बाजारात विक्रीसाठी आलेल्या बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र निर्सगाच्या अवकृपेने जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. मुग , उडिद, सोयाबिन शेतात मोड उठून पडले होते. तर अनेक नदी, तलावाच्या काठचे जमिनी ही पूराच्या पाण्यात खरडून गेले बांध फुटूले आहेत. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते.

शेतीची मशागत व दुरूस्ती करण्यासाठी पैसे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र राज्यात परत लाॅकडाऊन लागल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. आज पर्यंत बँके कडून कधीच कर्ज न घेतलेला शेतकरी यावर्षी पैसे नसल्याने पहिल्यांदाच बँके कडे पिक कर्जाचे प्रस्ताव दिला. मात्र आज आठ महिने झाले. तरी नविन पिक कर्ज धारक शेतकऱ्यांना बँकेने कर्ज मंजूर केले नाही. त्यामुळे मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथील स्टेट् बँक ऑफ इडिया या बँकेत नविन पिक कर्जासाठी प्रस्ताव पाठवलेल्या अनेक शेतकऱ्यांचे पिक कर्जाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे येथील बँकेने तात्काळ शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर करून द्यावे. अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. कारण जुन महिनाजवळ आला तरी शेतीचे कामे पुर्ण झाले नाहीत.

पेरणी साठी लागणारे खते, बी-बियाणे आणण्यासाठी जवळ पैसे नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जर बँकेने पिक कर्ज मंजूर करून दिले तर शेतकऱ्यांचे मशागतीचे कामे पुर्ण होतील. तसेच खते, बी-बियाणे आणण्यासाठी ही शेतकऱ्यांना मदत होईल.अन्यथा शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढून शेतीचे कामे करावी लागतील. त्यामुळे शेतकरी सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकतील आणि परत आत्महत्या सारखे प्रकार घडतील. त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर यांनी याकडे लक्ष देऊन येथील नविन पिक कर्ज धारक शेतकऱ्यांना न्याय द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

मतदानासाठी दारोदारी फिरणारे राजकीय लांडगे आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहेत.गेल्या आठ महिन्यापासून येथील शेतकरी कर्ज मागणी करत आहेत. मात्र नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तर मुखेड कडे पाठच फिरवली. मात्र मुखेड चे आमदार डाॅ.तुषार राठोड हे सुद्धा याकडे लक्ष देत नसल्याने मुखेड ला कोणी वालीच नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी नांदेड जिल्ह्यात कोणी लोकप्रतिनिधीच उरला नाही का ? हा प्रश्न आत्ता सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles