कोल्हापूर : “झाडे जगवा झाडे वाचवा” या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बाजीराव नाईक यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
आज पासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व खनिज उत्खनन, खनिजाचा साठा जप्त करून संबंधित आधिकारी यांच निलंबंन करून फौजदारी गुन्हे दाखल करा, व शाहुवाडी तालुक्यातील झाडांची होणारी कत्तल तसेच सॉ मिल, क्रेशर, वाहातुकीची साधन जप्त करून संबंधित दोषी आधिकारी कर्मचारी यांच्या वर देखील कारवाई झाली पाहिजे, तसेच शासनाने यावर बंदी घालावी, अशी मागणी बाजीराव नाईक.यांनी केली आहे.
नाईक म्हणाले, आज ऑक्सिजन मिळत नाही, जनता तडफडून जीव सोडत आहे. एक झाड, एका कुटुंबाला वाचवू शकते, असे असताना आज देखील राजरोसपणे वृक्ष तोड सुरूच आहे. झाडं जगली पाहिजेत, खनिज उत्खननामुळे जमिनीचं तापमान वाढून निसर्गासह सजीवांना धोका आहे, हे सर्व अधिकाऱ्यांना माहिती असताना वृक्ष तोड का केली जात आहे, असा सवालही केला आहे.
तसेच महाराष्ट्रसह कोल्हापूर जिल्हा व शाहुवाडी तालुक्यातील वृक्ष तोड, खनिज उत्खनन, जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे नाईक म्हणाले.