Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करा नाना काटे यांची मागणी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता हा विविध खोदकामामुळे खूप खराब झाला असून या रस्त्यावर खूप खड्डे पडलेले असून रस्ता खिळखिळीत झाला आहे.या खड्डेमय रस्त्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात. महानगरपालिकेतर्फे या रस्त्याची वारंवार तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी केली जाते.परंतु पुन्हा काही कामासाठी रस्ता खोदला जातो व रस्त्याची परिस्तिथी जैसे थे होते,संपूर्ण पिंपळे सौदागर मधील मुख्य रस्ते हे सिमेंट काँक्रिटचे झाले असून हा रस्ता अजून शासकीय निविदेत अडकला आहे,त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने परिसरातील नागरिक हा रस्ता कधी होणार किवा याचे डांबरीकारण कधी होणार या नागरिकांच्या प्रश्नाच्या रोषास आम्हाला सामोरे जावे लागत आहे.या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करावे,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत नाना काटे यांनी म्हटले आहे की, मुळात हा रस्ता कोणत्या विभागाने करायचा या सरकारी प्रशासन निर्णयात या रस्त्याचे काम रखडले आहे,तसेच या रस्त्या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत कळाले कि, या रस्त्याचे काम २०२४ ला सुरु करणार आहेत मग या रस्त्यावरील खड्यामुळे मोठा अपघात झाल्यास त्यास जवाबदार कोण..? मा. आयुक्त साहेब हा कुणाल आयकॉन रस्ता खूप रहदारीचा व वर्दळीचा आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निवासी सोसायट्या,शाळा, व्यावसायिक दुकाने आहेत त्यामुळे हा रस्ता खूप महत्वाचा आहे,पावसाळा काही दिवसांवर आला असून शाळा देखील चालू होणार आहेत. विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामूळे अनसेफ कंडिशन्स निर्माण झाल्या आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे काम सुरु होईल तेव्हा होईल परंतु सद्य परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता त्वरित या रस्त्याची तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी न करता संपूर्ण रस्त्याचे डांबरीकारण करण्यात यावे, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.

---Advertisement---


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles