Wednesday, April 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Mumbai : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव ठरवा – संयुक्त किसान मोर्चाची मागणी

दि. 8 ऑगस्ट ह्या दिवशी महाराष्ट्र भर निदर्शने (Mumbai)

---Advertisement---

मुंबई : संयुक्त किसान मोर्चाची महत्वाची बैठक भुपेश गुप्ता भुवन मुंबई येथे संपन्न झाली.
उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी ज्या ज्या राज्यात भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्या विरोधात तीव्र आंदोलन केले त्या प्रत्येक राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. (Mumbai)

संयुक्त किसान मोर्चा (SKM) नेतृत्वाखाली स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे किमान हमीभाव (MSP)सह विविध मागण्यासाठी उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली आदी राज्यात आंदोलने केली, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेली दडपशाही यामुळे २०२४ च्या लोकसभेत भाजपला बहुमत मिळू शकले नाही. असा निष्कर्ष मुंबई येथील (दि. २० जुलै) बैठकीत काढण्यात आला. या बैठकीत राज्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. (Mumbai)

या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले.

१) दि. ८ ऑगस्ट ह्या दिवशी महाराष्ट्र भर निदर्शने केली जातील.

२) केंद्र आणि राज्य सरकारचे कृषी बजेट स्वतंत्र असावे.

३) स्वामीनाथन आयोगावर आधारित MSP दिला जावा.

४)) २०१३ प्रमाणे भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी केली जावी.

५) वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाने जमिनीची लूट थांबवली जावी. आदी मागण्या वर बैठकीत भर देण्यात आला.


दि. १७ ऑगस्ट या दिवशी विभागवार समान पाणी वाटप या विषयावर चर्चासत्र घेण्यात येतील

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव त्या राज्यात झाला जिथे शेतकरी आंदोलन तीव्र प्रमाणात झाले होते. उत्तर प्रदेश, पंजाब ,हरियाणा आणि महाराष्ट्र यात अग्रेसर होते. (Mumbai)

महाराष्ट्र राज्याच्या येणाऱ्या विधानसभेत ही याची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार झाला असून त्याबाबत सविस्तर रणनीती ठरवली जाईल व त्यासाठी दिनांक 24 ऑगस्ट ला एक कार्यशाळा घेण्यात येईल. असे या बैठकीत निर्णय झाले आहेत.

या बैठकीला कॉम्रेड डाॅ. अशोक ढवळे, कॉम्रेड उमेश देशमुख, कॉम्रेड राजन क्षीरसागर, अँड. कॉम्रेड हिरालाल परदेशी, प्रतिभा शिंदे, कॉम्रेड आत्माराम भिसे, कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड आर.टी गावीत, मेधा पाटकर, उल्का महाजन, ब्रायन लोबो आदी मान्यवर उपस्थित होते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles