Saturday, December 14, 2024
Homeराज्यMumbai : शैक्षणिक वर्षाची सुरवात आता १ एप्रिलपासून; सुकाणू समितीचा निर्णय; राज्य...

Mumbai : शैक्षणिक वर्षाची सुरवात आता १ एप्रिलपासून; सुकाणू समितीचा निर्णय; राज्य शासनाचा लवकरच निर्णय

मुंबई / वर्षा चव्हाण – ‘सीबीएसई’च्या पॅटर्नप्रमाणेच आता राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात आता १ एप्रिलपासून करण्याच्या तयारीत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या सुकाणू समितीने तशी शिफारस राज्य शासनाला केली आहे. (Mumbai)

तीन वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने ३२ सदस्यांची सुकाणू समिती स्थापन केली होती. ही सुकाणू समिती राज्यातील भौगोलिक, सांस्कृतिक आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करते. त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण प्रत्येक शाळेत प्रभावीपणे राबविण्यासाठी समितीचा उद्देश आहे.

२०२६-२७ पासून त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे, पण तत्पूर्वी शासनाचा अंतिम आदेश काढला जाणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार तीन टप्पे आहेत. (Mumbai)

– बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंत पहिला टप्पा
– तिसरी ते पाचवीपर्यंत दुसरा टप्पा
– नववी ते बारावीपर्यंत तिसरा टप्पा

इयत्ता नववीपासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा व दुसरी देशातील कोणतीही किंवा परदेशी एक भाषा निवडता येईल. विषयांची मर्यादा कमी होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत.

‘सीबीएसई’कडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने आता राज्य शासन देखील गणित व विज्ञान हे दोन विषय ‘सीबीएसई’प्रमाणेच ठेवणार आहे. यासाठी राज्याच्या सुकाणू समितीने मान्यता दिली असून आता याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. सुरवातीला २०२५-२६पासून दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार असून त्यानंतर २०३०पर्यंत संपूर्ण धोरण राज्यभर लागू होणार आहे.

ठळक बाबी…

● तिसरी ते दहावीचा अभ्यासक्रम आराखडा मंजूर झाला असून आता अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तीन महिने लागतील.

● अध्यापनाचे तास ४५ मिनिटांऐवजी आता ५० मिनिटांचे असतील, तासिकेचा वेळ दोन सत्रात व एका सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी वेगवेगळे असतील.

● परीक्षांमधील विद्यार्थ्यांची घोकंपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक पद्धतीनुसार शिकविण्यावर शिक्षकांचा भर राहील.

● सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची दहा दिवस दप्तराविना शाळा भरेल, त्या काळात विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या कलेतून इंटर्नशिप करतील.

● दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेची रचना बदली जाणार असून वर्षात दोनदा परीक्षा होईल, त्यात एक मुख्य व दुसरी श्रेणी सुधारणा परीक्षा होईल.

● ‘सीबीएसई’प्रमाणेच राज्य मंडळाचा अभ्यासक्रम देखील साम्य असेल, गणित व विज्ञान विषय ‘सीबीएसई’प्रमाणेच साम्य राहतील.

राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता यापूर्वीच दिलेली आहे. राज्यातील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १ एप्रिलपासून करायचे नियोजित आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधीचा शासन निर्णय काही दिवासांत निघेल. दुसरीकडे ‘सीबीएसई’प्रमाणेच आपला अभ्यासक्रम राहील किंवा त्याहून उत्तम देखील असेल.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !

मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास

Fire : तामिळनाडूत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 7 ठार

महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर

धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल

संबंधित लेख

लोकप्रिय