Thursday, December 12, 2024
HomeनोकरीMPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे विविध संवर्गाचा निकाल जाहीर

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे विविध संवर्गाचा निकाल जाहीर

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, या पदाच्या मुलाखती दिनांक 05 व 06 डिसेंबर, 2024 रोजी घेण्यात आल्या होत्या.

या संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.


सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक,

दापचारी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा संवर्गाचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय/प्रकल्प व्यवस्थापक, दापचारी (तांत्रिक) महाराष्ट्र मत्स्यसेवा, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, गट-अ, या संवर्गाकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाकरिता आरक्षित पदे वगळून प्रस्तुत संवर्गाच्या मुलाखती दिनांक 01 सप्टेंबर,2023 रोजी घेण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने या पदाचा निकाल यापूर्वीच दिनांक 20 ऑक्टोबर, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

चाळणी परीक्षेअंती पात्र ठरलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 28 फेब्रुवारी,2024 रोजी घेण्यात आल्या असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाकरिता आरक्षित पदांचा समावेश करुन प्रस्तुत संवर्गाचा सुधारित निकाल प्रसिध्द करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024

या परीक्षेच्या प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 01 डिसेंबर, 2024 रोजी घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपुस्तिका क्रमांक 1 व प्रश्नपुस्तिका क्रमांक 2 या विषयांच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकांच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची मुदत दिनांक 10 डिसेंबर, 2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु असून ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच support-online@mpsc.gov.in या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.


सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (अलिबाग)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (अलिबाग) या पदाच्या मुलाखती दिनांक 12 व 13 नोव्हेंबर, 2024 रोजी घेण्यात आल्या होत्या. विचाराधीन पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक 5 डिसेंबर, 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.


तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-अ या पदाच्या मुलाखती दिनांक ०५ डिसेंबर, २०२४ ते ०६ डिसेंबर, २०२४ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.


कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील उमेदवारांची शासनाकडे शिफारस

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे कर सहायक परीक्षा-२०१६ कर सहायक गट क संवर्गाच्या प्रतीक्षायादीमधून अराखीव सर्वसाधारण वर्गवारीचे एक पद व भ.ज. (क) वर्गवारीचे एक पद अशी दोन पदे राखून ठेवून उर्वरीत ४० पदांकरिता शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. राखून ठेवलेल्या दोन पदाबाबत शासनाचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर या पदांच्या शिफारशीबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रतीक्षायादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.


इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब,

चाळणी परीक्षा -२०२४ सुधारित निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १८ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब, या परीक्षेचा निकाल दिनांक १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. काही उमेदवारांनी केलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने निकाल सुधारित करुन आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

त्यानुसार नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

MPSC

google news gif

हे ही वाचा :

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती

पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरती सुरू; आजच अर्ज करा !

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती, आजच अर्ज करा

कर्नाटक बँकेत मोठी भरती, आजच अर्ज करा

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदाच्या 336 जागांसाठी भरती

NTPC Bharti : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 50 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 526 जागांसाठी भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती, पात्रता : 4थी, 10वी

SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

IITM : पुणे येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय