---Advertisement---
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शस्त्रक्रियेसाठी त्यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. राज ठाकरे यांची शस्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार होती. पण त्यांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून म्हटले आहे की, आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्रक्रीया व्यवस्थितरित्या पार पडली. काही वेळापुर्वीच रूग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम असो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
---Advertisement---