जुन्नर / आनंद कांबळे : न्यूरोथेरपी व नेचुरोपॅथी चिकित्सा ही नैसर्गिक पध्दतीने गुडघेदुखी, सांधेदुखी, तसेच मणक्याचे आजारांवर विना औषधे विना ऑपरेशन उपचार पध्दती असून या शिबिरांना रुग्णांना होणारा लाभ व मिळणारा प्रतिसाद पहाता तालुक्यात विभागवार अशा शिबिरांचे आयोजन करणार असल्याची माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिली. (Junnar)
आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्रीराम पतसंस्था नारायणगाव व वल्लभ पतसंस्था जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर मधील कोंडाजीबाबा डेरे आश्रमात या चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. (Junnar)
याप्रसंगी युवानेते अमित बेनके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षक उज्ज्वला शेवाळे, विनायक तांबे, या शिबिराचे प्रमुख डॉ. संतोष गोस्वामी, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे, माजी नगरसेवक भाऊसाहेब कुंभार, फिरोज पठाण, वल्लभ पतसंस्थेचे सुमित परदेशी, नरेंद्र कासार, श्रीराम पतसंस्थेचे शशिकांत वाजगे, अनिल थोरात, राजश्री बेनके, सुनील श्रीवत, यल्लू लोखंडे, अनिल डेरे, ज्ञानेश्वर रासने, विजय घोगरे, दयानंद डुंबरे, विजया उनकुले, नवनाथ चौगुले, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैष्णवी चतुर, आदिवासी नेते काळू शेळकंदे, किसन मेहेर, बाळासाहेब सदाकाळ, विशाल भुजबळ, कार्यकारी अधिकारी मंगेश नलावडे, बिहारीलाल परदेशी, सुहास चिखले, विलास कडलक, नितीन गांधी, दत्तात्रय म्हस्के, नितीन गाजरे, उत्तम घुले, संजय ढेकणे, सखाराम घोटकर, मुख्याधिकारी राजेंद्र परदेशी, राजेंद्र पानसरे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच वर्षात तालुक्यात रस्ते, आरोग्य, शिक्षण, सिंचन, विद्युत आदी भौतिक सुविधांकरिता राज्य शासनाकडून मोठा निधी पाठपुरावा करून आणलेला असतानाही विरोधक दिशाभूल करत आहेत. जुन्नर शहरात आजवरच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध केला आहे. हिंदू मुस्लिम तसेच सर्वच समाज बांधवांसाठी धार्मिक तसेच सामाजिक कामांसाठी निधी दिला आहे व कामेदेखील प्रगतीपथावर असल्याचे बेनके यांनी यावेळी सांगितले. संतोष ढोबळे यांनी सुत्रसंचालन केले तर बाळासाहेब सदाकाळ यांनी आभारप्रदर्शन केले.
हेही वाचा :
गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर
दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन
ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड